… तर भारतासह आजूबाजूच्या देशांचेही भाग्य बदलले असते – प्रवीण दीक्षित 

107
देशाच्या स्वातंत्र्यानंतर आज २०१४ सालापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वीर सावरकरांचे विचार अमलात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जर आपण वीर सावरकर यांच्या विचारांप्रमाणे याआधीच वागलो असतो, तर केवळ भारतच नव्हे, तर आजूबाजूच्या देशांचे भाग्यही बदलले असते, असे विधान माजी पोलीस महासंचालक, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने दरवर्षी शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार, तसेच शिखर सावरकर पुरस्कार दिले जातात. रविवार, २२ मे २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाला. यावेळी प्रवीण दीक्षित बोलत होते. वीर सावरकर यांचे लिखाण अत्यंत उत्कृष्ठ आणि दर्जेदार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आपण जेवढे वाचाल तेवढी आपली स्फूर्ती आणि प्रेरणा वाढत जाते. वीर सावरकर यांनी इतिहासावर केलेले लिखाण असो किंवा त्यांनी लिहिलेले काव्य, गद्य, नाट्य असो या सर्व साहित्याचा एकच गाभा होता, तो म्हणजे राष्ट्रनिष्ठा, असेही प्रवीण दीक्षित म्हणाले.

दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरही वीर सावरकर यांच्यावर अत्याचार  

वीर सावरकर यांनी गीता, उपनिषदे आत्मसात केली होती. त्यामुळे ते जीवंतपणीच ‘हे शरीर म्हणजे मी नव्हे’, या विचारावर पोहचले होते. ते स्थूल देहाच्या पलीकडे गेले होते. त्यामुळे या शरीराला ब्रिटिशांनी कितीही त्रास दिला तरी मी माझ्या ध्येयापासून तसूभर मागे हटणार नाही, असा दृढनिश्चय त्यांनी केला होता. म्हणून ब्रिटीश वीर सावरकरांवर काहीही परिणाम करू शकले नव्हते. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरही वीर सावरकर विचारांची जी असहिष्णुता म्हणतात, त्या विचारांचे बळी पडले होते. विशेष म्हणजे वीर सावरकर यांनी आधीच स्पष्ट केले होते की, मला निवडणूक लढवायची नाही. मला पंतप्रधान, राष्ट्रपती व्हायचे नाही. मी कुठल्याही स्पर्धेत नाही, तरीही वीर सावरकर यांचे विचार दाहक आहेत, राष्ट्रप्रेमाचे होते म्हणून त्यांच्यावर अत्याचार केले जात होते, असेही प्रविण दीक्षित म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.