स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुरस्कारांचे दिमाखदार सोहळ्यात वितरण

151

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने दरवर्षी शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार तसेच शिखर सावरकर पुरस्कार देण्यात येतो. वीर सावरकर यांच्या १३९व्या जयंतीनिमित्ताने रविवार, २२ मे २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. याप्रसंगी स्मारकाने तयार केलेल्या ‘सावरकरांच्या समाजक्रांतीची यशोगाथा’ या लघुपटाचे लोकार्पणही करण्यात आले.

(हेही वाचा १८ दहशतवाद्यांना यमसदनी पाठवणारे सुभेदार राळे यांचा ‘शौर्य पुरस्कारा’ने सन्मान)

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर ‘अखिल हिंदू ध्वज…’ हे सावरकर गीत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या ‘कलांगण’च्या विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अतुल भातखळकर,  ग्रूप कॅप्टन निलेश देखणे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर व्यासपीठावर उपस्थित होते.

(हेही वाचा वीर सावरकरांच्या विचारांचे विस्मरण झाल्याने स्वातंत्र्यानंतर गंभीर परिणाम भोगावे लागले – रणजित सावरकर)

यांचा झाला पुरस्काराने सन्मान

‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ सुभेदार संतोष राळे यांना प्रदान करण्यात आला. एक लाख एक हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. संरक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे अतुल राणे यांचा ‘विज्ञान पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. एकावन्न हजार रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. वीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार करणा-या वडोदरा येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक केंद्रा’ला स्मृतीचिन्ह पुरस्कार देण्यात आला. पंचवीस हजार रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. गिर्यारोहण क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणारे सुशांत अणवेकर यांना ‘शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार २०२१’ प्रदान करण्यात आला. तर रत्नागिरी येथील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स संस्थेचा ‘शिखर सावरकर दुर्ग संवर्धन’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

(हेही वाचा संरक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे अतुल राणे यांचा ‘विज्ञान पुरस्कारा’ने गौरव)

यानंतर सावरकर क्रीडाप्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये तायक्वांडोचे प्रशिक्षक राजेश खिलारी, तनवीर राजे, मौर्यांश मेहता, इशा शाह, रायफल शुटिंगचे रुचिता विनेरकर, रायफल शुटिंग प्रशिक्षक विश्वजीत शिंदे, ‘अनादी मी अनंत मी…’ या गीतावर नृत्य करणारे गुरुराज कोरगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अतुल भातखळकर,  ग्रूप कॅप्टन निलेश देखणे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर उपस्थितांना संबोधित केले.

(हेही वाचा वडोदरा येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक केंद्रा’ला स्मृतीचिन्ह पुरस्कार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.