स्वातंत्र्यवीर सावरकर बॉक्सिंग क्लबचे सुयश

151

जोगेश्वरी येथे आयोजित १८ व्या ज्युनियर गर्ल्स महाराष्ट्र स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या जागृती बोथ (७० किलो वजनी गट) आणि रिया सुतार (८० किलो वजनी गट) यांनी पदक पटकावले आहे.

( हेही वाचा : यंदा दिवाळीत दिसणार सूर्यग्रहण! )

जागृती बोथ आणि रिया सुतार यांना पदक

मुंबईतील जोगेश्वरी येथे दिनांक ७ ते १० ऑक्टोबर २०२२ या दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आता या दोन्ही विजेत्या मणिपूरमधील इम्फाळ येथे दिनांक २७ ऑक्टोबर ते दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत होत असलेल्या पाचव्या ज्युनियर गर्ल्स नॅशनल्समध्ये महाराष्ट्राच्या चमूत प्रतिनिधीत्त्व करणार आहेत. त्याचप्रमाणे वेस्ट झोन बॉक्सिंग चॅम्पियनशिप २२ नोव्हेंबर २०२२ या दिवशी भोपाळ येथे होणार असून तेथेही या दोघी प्रतिनिधीत्त्व करणार आहेत, अशी माहिती वीर सावरकर बॉक्सिंग क्लबचे राजन जोथाडी यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.