स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि कलांगण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ३० मे २०२२ रोजी महाकवी सावरकर अंतिम गीत गायन स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झााला. सोमवारी झालेल्या या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतून पहिला, दुसरा आणि तिसरा असे क्रमांक काढण्यात आले. तसेच, दोन पारितोषके उत्तेजनार्थ देण्यात आली. या अंतिम स्पर्धेत लहान आणि खुल्या अशा दोन गटांमधून २१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी विशेष अतिथी आणि परीक्षक म्हणून संगीतकार मिलिंद जोशी आणि निलेश मोहरीर उपस्थित होते.
२ एप्रिल २०२२ गुढीपाडवा यादिवशी महाकवी सावरकर गीतगायन स्पर्धेची घोषणा करण्यात आली होती. या स्पर्धेत लहान आणि खुल्या गटामध्ये मिळून ४५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धक केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर पदेशातूनही आले होते.
मंजिरी मराठे यांची संकल्पना
सोमवारी झालेल्या अंतिम फेरीसाठी मोठ्या गटातून १० स्पर्धक आणि लहान गटातून सर्व लहान स्पर्धकांना गायनाची संधी देण्यात आली होती. स्पर्धा उत्तमरित्या संपन्न झाली. स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांच्या संकल्पनेतून मराठीत ‘शतजन्म शोधिताना’ आणि हिंदीत ‘स्वातंत्र्यवीर’ या कार्यक्रमांचे अनेक प्रयोग झाले.या कार्यक्रमांमध्ये संगीतकार वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली ‘सावरकर गीते’ या स्पर्धेत गाण्यात आली.
श्रोत्यांच्या मतदानातून एका स्पर्धकाची निवड
विशेष म्हणजे खुल्या वर्गात ८० वर्षांचे सत्यविजय भागवत यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे श्रोत्यांकडून मतदान करण्यात आले. त्यात लहान आणि खुला गट यामधून एकच क्रमांक काढण्याचे श्रोत्यांना आवाहन करण्यात आले होते. या विजेत्याला वीर सावरकरांचे ध्वनीमुद्रित गाणे बक्षीस म्हणून देण्यात आले. श्रोत्यांनी केलेल्या मतदानात सगळ्यात लहान वयाचा स्पर्धक स्मयन आंबेकर विजेता ठरला.
सोमवारी झालेल्या या कार्यक्रमाचा बक्षीस समारंभ परीक्षक संगीतकार मिलींद जोशी आणि मुंबई पुणे मुंबईचे संगीतकार निलेश मोहरीर यांच्या हस्ते झाला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर उपस्थित होते.
( हेही वाचा: Bmc election 2022 : कोणत्या प्रभागांचे काय आरक्षण पडले जाणून घ्या )
महाकवी सावरकर गीत गायन अंतिम स्पर्धा निर्णय
बालगट
१) अनया मोहिते
२) स्मयन आंबेकर
३) सई जोशी
उत्तेजनार्थ
श्रीनिवास हसबनीस
उत्तेजनार्थ
अवनी भाले
खुला गट
१)ऐश्वर्या सहस्रबुद्धे
२) पुष्कर गाडगीळ
३) आरोही प्रभुदेसाई
उत्तेजनार्थ
गीतिका कुलकर्णी
उत्तेजनार्थ
सत्याविजय भागवत (वय वर्षे ८० ज्येष्ठ नागरिक)
गीते : स्वातंत्र्यवीर सावरकर, रणजित सावरकर, समीर सामंत, श्रीनिवास शिंदगी
संगीत दिग्दर्शन : वर्षा भावे
वाद्य संयोजन : कमलेश भडकमकर
वादक : अर्चिस लेले, अनिल करंजवकर, हनुमंत रावडे, सागर साठे, श्रुती भावे, कमलेश भडकमकर
विशेष सहयोग : मंजिरी मराठे, रणजित सावरकर, राजेंद्र वराडकर, स्वप्नील सावरकर, स्मारक कर्मचारी वर्ग आणि कलांगण टीम.