स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तैलचित्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते शुक्रवारी होणार अनावरण

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या तैलचित्राचे अनावरण शुक्रवार दिनांक ८ जुलै २०२२ या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याहस्ते दुपारी ४ वाजता होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, शिवाजी उद्यान येथे हा तैलचित्र अनावरण समारंभ होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एस. एस. मोरिया बोटीतून ब्रिटिशांच्या तावडीतून निसटून फ्रान्सच्या मार्सेय येथे पाऊल ठेवले होते, त्या साहसदिनाच्या म्हणजे ८ जुलै १९१० या दिवसाचा योग साधून या तैलचित्राचे अनावरण होत आहे.

( हेही वाचा : वीर सावरकरांचा अवमान करणाऱ्यांना शिकवणार धडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन)

हे तैलचित्र सुविख्यात चित्रकार सुहास बहुळकर यांनी चितारले असून ते ही या समारंभाला उपस्थित राहाणार आहेत. यावेळी सावरकर स्मारकाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे तसेच कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सहकार्यवाह स्वप्नील सावरकर हे उपस्थित राहाणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here