वीर सावरकर कालापानी मुक्ति शताब्दी : २ ते १६ मे दरम्यान ऑनलाइन व्याख्यानमाला

या व्याख्यानमालेचा शुभारंभ रविवार, २ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्या 'सावरकर और हिंदू संगठन' या विषयांवरील व्याख्यानाने होणार आहे.    

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर यांची अंदमानातील तुरुंगातून २ मे १९२१ या दिवशी मुक्तता झाली. त्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने त्या दिवशी म्हणजे २ मे २०२१ पासून वीर सावरकर कालापानी मुक्ति शताब्दी व्याख्यानमाला ऑनलाइन आयोजित करण्यात येत आहे.

नामांकित सावरकर अभ्यासकांचा सहभाग असणार!  

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने हे आयोजन करण्यात येत असून सावरकर स्मारकाच्या फेसबुक पेजवर रविवार, २ मे ते रविवार, १६ मे या दरम्यान ही ऑनलाइन व्याख्यानमाला होणार आहे. देशातील नामांकित सावरकर अभ्यासक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर व्याख्यान सादर करणार आहेत. सर्व व्याख्याने हिंदी भाषेत असतील. सायंकाळी ७ वाजता ही व्याख्याने होणार आहेत. या व्याख्यानमालेत रविवार, २ मे या दिवशी पहिले व्याख्यान सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांचे असेल. सावरकर और हिंदू संगठन असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय असेल. या व्याख्यानांचा आस्वाद घेण्यासाठी https://www.facebook.com/savarkarsmarak या लिंकवर जावे.

(हेही वाचा : महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हुतात्म्यांना अभिवादन!)

पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्याकडून व्याख्यानमालेचा होणार समारोप!

अन्य व्य़ाख्यानांमध्ये मंगळवार, ४ मे रोजी अंकुर शर्मा यांचे ‘जम्मू : अब हिंदू अस्तित्व की आरपार लडाई’, गुरुवार, ६ मे  रोजी कॅप्टन सिकंदर रिझवी यांचे ‘वीर सावरकर का हिंदुत्व और निधर्मिता’, शनिवार, ८ मे या दिवशी उदर माहुरकर यांचे  ‘हिंदुत्व पर समझौता नहीं’, सोमवार,  १० मे डॉ. नीरज श्याम देव यांचे ‘सामाजिक क्रांतिवीर सावरकर’ तसेच बुधवार, १२ मे या दिवशी कपिल कुमार यांचे ‘वीर सावरकर, राष्ट्रवाद और विश्व युद्ध’ या विषयावर व्याख्यान होईल. शुक्रवार, १४ मे या दिवशी जी. डी. बक्षी हे  ‘कोविड १९-एक खौफनाक खुलासा’, यावर व्याख्यान देतील. या व्याख्यानमालेचे समारोपाचे व्याख्यान नामवंत हिंदुत्ववादी अभ्यासक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे असून ‘सावरकर की महत्तता’ या विषयावर त्यांचे व्याख्यान असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here