स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सेवा-समर्पित राष्ट्राभिमानी कार्यकारिणीला पुन्हा संधी!

161

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची सर्वसाधारण सभा रविवार, २५ डिसेंबर २०२२ रोजी संपन्न झाली. यावेळी निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांची नावे निवडणूक अधिकारी संजय जोशी यांनी घोषित केली. त्यानंतर कार्यकारिणी सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकारिणीची निवड करण्यात आली. माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची अध्यक्षपदी, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांची कार्याध्यक्ष पदी पुनर्नियुक्ती झाली. तसेच कोषाध्यक्ष पदी मंजिरी मराठे, कार्यवाह पदी राजेंद्र वराडकर आणि सह कार्यवाह पदी स्वप्नील सावरकर यांचीदेखील पुनर्नियुक्ती झाली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या विद्यमान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात वीर सावरकरांच्या विचारांची सेवा-समर्पण आणि प्रचार-प्रसार करून स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. यामुळेच सावरकरप्रेमींनी पुन्हा एकदा विद्यमान पदाधिकारी आणि कार्यकारिणीवर विश्वास दाखवला आहे. म्हणून पुन्हा याच कार्यकारिणीकडे स्मारकाचा पदभार सोपवण्यात आला आहे.

नवनिर्वाचित कार्यकारिणी 

  • अध्यक्ष –  प्रवीण दीक्षित
  • कार्याध्यक्ष – रणजित सावरकर
  • कोषाध्यक्ष – मंजिरी मराठे
  • कार्यवाह – राजेंद्र वराडकर
  • सह कार्यवाह – स्वप्नील सावरकर

कार्यकारिणी सदस्य (आश्रयदाता विभाग) 

  • के. सरस्वती
  • विज्ञानेश शंकर मासावकर
  • अभय जोशी
  • कमलाकर गुरव

कार्यकारी सदस्य (सामान्य विभाग)

  • चंद्रशेखर साने (पुणे)
  • दीपक कानुलकर
  • डॉ. अमित नाबर
  • चिरायू पंडित (वडोदरा)
  • भाग्यश्री सावरकर (पुणे)

(हेही वाचा फाळणीला विरोध करणाऱ्या नेहरुंचे २ दिवसांत मतपरिवर्तन कसे झाले? राहुल गांधींनी खुलासा करावा रणजित सावरकरांचे आव्हान)

उपरोक्त कार्यकारिणी सदस्यांमध्ये (सामान्य विभाग) पहिल्यांदा निवडून आलेल्या दीपक कानुलकर, डॉ. अमित नाबर, चिरायू पंडित (वडोदरा) आणि भाग्यश्री सावरकर (पुणे) या तरुण चेहऱ्यांचा समावेश आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या विद्यमान कार्यकारिणीवरील पदाधिकाऱ्यांमध्ये माजी आयपीएस अधिकारी प्रवीण दीक्षित हे दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. गेली १८ वर्षे वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर हे स्मारकाचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. पुन्हा एकदा त्यांची या पदावर निवड झाली आहे. तर कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सहकार्यवाह स्वप्नील सावरकर यांचीही पुनश्च निवड झाली आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांमधील कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि कार्यवाह हे पदाधिकारी गेली १८ वर्षे स्मारकाचे कामकाज पाहत आहेत. कालांतराने यात अन्य काही सदस्य सहभागी झाले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक हे सशक्त विचार, हिंदूत्वाच्या कार्याचे एक शक्तिशाली केंद्र बनले आहे.

smarak 2
सर्वसाधारण सभेत सहभागी झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सदस्य.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी स्वतःचे आयुष्य अर्पण केले अशा वीर सावरकर यांच्या विरोधात स्वातंत्र्यानंतर त्यांच्या बदनामीचे मोठे षडयंत्र रचण्यात आले. मात्र स्मारकाच्या कार्यकारिणी समितीने याला पुराव्यानिशी तीव्र विरोध केला. त्यामुळे या समितीची विश्वासार्हता वाढली आहे. यामुळेच त्यांच्या कार्याला बळ देण्यासाठी या कार्यकारिणीवर सगळ्यांनीच विश्वास दाखवला आहे.

गांधी परिवाराची बोलती बंद

राहुल गांधी आणि सोनिया गांधी आपल्या राजकीय फायद्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सातत्याने खोटे आरोप करत आहेत. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात वीर सावरकरांवर राहुल गांधींनी पुन्हा अशोभनीय टिप्पणी केली. त्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी नेहरू आणि गांधींनी इंग्रजांना दिलेली पत्रे, नेहरूंचे माउंटबॅटन यांच्या पत्नी एडविना यांच्याशी असलेले संबंध आणि भारताच्या फाळणीबाबत नेहरूंनी एकट्याने घेतलेला निर्णय यावर पुराव्यासह प्रश्न विचारले. राहुल गांधींच्या बडबडीला महाराष्ट्रातील काँग्रेसच्या मित्र पक्षांनीही प्रत्युत्तर दिले आणि राहुल गांधींचे तोंड बंद झाले. वीर सावरकरांच्या विरोधात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून होत असलेल्या दुष्प्रचाराविरोधात स्मारक समितीने न्यायालयीन लढाईही सुरू केली आहे.

(हेही वाचा गांधी हत्येचे धागेदोरे काँग्रेसपर्यंत पोहचतात! रणजित सावरकरांचा ‘एबीपी माझा कट्ट्या’वरून खळबळजनक आरोप)

‘द वीक’ नतमस्तक, ‘एबीपी माझा’ने माफी मागितली

‘द वीक’ नावाच्या नियतकालिकाने वीर सावरकर यांच्याविषयी अत्यंत चुकीचा लेख प्रकाशित केल्याचे मान्य केले. तसेच जाहीर माफी मागितली. २८ मे २०१८ रोजी ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीने वीर सावरकरांचा अपमान करणारा कार्यक्रम प्रसारित केला. त्याला रणजित सावरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीने कडाडून विरोध केला होता. त्यामुळे ‘एबीपी माझा’च्या विरोधात जनक्षोभ उसळला होता. या वाहिनीच्या विरोधात कायदेशीर कारवाईची पावले उचलण्यात आली. वीर सावरकरप्रेमींच्या बहिष्कारामुळे या वाहिनीला इतका धक्का बसला की, वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांनी माफी मागितली.

भगूर येथील वीर सावरकरांच्या जन्म ठिकाणाचा विकास

नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे असलेले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान त्यांच्या जीवनाचा इतिहास आहे. या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाच्या कामाची जबाबदारी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने महाराष्ट्र सरकारकडून स्वीकारली.

मार्सेलिस येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस समुद्रात ऐतिहासिक उडी घेतली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील वीर सावरकर यांचे हे साहस, त्यांचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी मार्सेलिस येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर स्मारकाच्या प्रयत्नांना सहकार्य करत आहेत. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा झाली असून या कामात केंद्र सरकार स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पाठीशी आहे.

रत्नागिरी कारागृहात स्मृती दालन

अंदमानहून परतल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. त्या कारागृहाला स्मृती दालन म्हणून विकसित केले गेले आणि २८ मे २०१८ रोजी त्याचे लोकार्पण करण्यात आले. रत्नागिरी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कारागृहात सहन केलेल्या यातना, स्थानबद्धता आणि सामाजिक कार्य या घटनांची ऐतिहासिक साक्ष आहे.

(हेही वाचा 2047 पर्यंत भारतात मुस्लिम राजवट आणण्याचा पीएफआयचा डाव, माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षितांचा खळबळजनक दावा)

प्रसारमाध्यम क्षेत्रात पदार्पण

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे जग बंद होते, मात्र याच काळात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ऑडिओ आणि व्हिडिओ स्टुडिओ आकाराला आला. हा स्टुडिओ स्मारकाच्या बातम्या प्रसारित करण्यासाठी उपयोगात येत आहे. वीर सावरकर ऑडिओ आणि व्हिडीओ स्टुडिओसोबत ‘हिंदुस्थान पोस्ट’ नावाचे मीडिया हाऊसही सुरू केले. ज्यामध्ये हिंदुस्थान पोस्ट हिंदी आणि मराठी वेब पोर्टल आणि साप्ताहिक वर्तमानपत्र प्रकाशित केले जाते. ऑक्टोबर २०२० पासून आजपर्यंत एक कोटीहून अधिक दर्शक संख्येसह हे न्यूज पोर्टल राष्ट्रनिष्ठ आणि तत्वनिष्ठ माध्यम बनले.

लडाखमध्ये वीर सावरकर माऊंटेनरिंग इन्स्टिट्यूट ऑफ सर्च अँड रेस्क्यू

युद्ध सदृश्य वातावरण असतानाही चीनच्या सीमेलगत जाऊन स्मारकाच्या वीर सावरकर माऊंटेनरिंग इन्स्टिट्यूट ऑफ सर्च अँड रेस्क्यू या सारख्या प्रकल्पाची सुरुवात केली. लडाख माऊंटेनरिंग अँड अॅडव्हेन्चर क्लबच्या सहकार्याने कार्यरत आहे. २७ ऑक्टोबर २०१९ पासून त्याचे कार्य सुरु आहे. कोर्समध्ये सहभागी होणा-या शूरवीर, जवान तसेच धैर्यशाली नागरिक निर्माण करण्यासाठी निःशुल्क प्रशिक्षण देणाऱ्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

‘मृत्युंजय’ची निर्मिती

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमान पर्वावर आधारित ‘मृत्युंजय’ या नाटकाची निर्मिती केली, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. जेएनयू आणि दिल्ली विद्यापीठात मृत्युंजयचा प्रयोग झाला. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) येथे दोन वेळा दिल्ली विद्यापीठ आणि नाशिक मध्यवर्ती कारागृहात १/१ प्रयोग, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर १८० हून अधिक प्रयोग झाले. ‘हे मृत्युंजय’ नाटकातून स्फूर्ति घेत दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून सावरकरांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली.

शिखर सावरकर

हिमाचल प्रदेशातील बातल प्रांतात कर्चा नाला परिसरातील ६, ०६० मीटर म्हणजेच १९,८८१ फूट उंचीच्या बेलाग हिमशिखर इंडियन माउंटेनिअरिंग फेडरेशनच्या सदस्य के सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र गंद्रे, राजेद्र वराडकर, आनंद शिंदे, श्रीरंग नाडगौडा, राहुल दंडवते, दिलीप साहू, संदीप शेट्टी यांनी पादाक्रांत केले. या शिखराला स्वातंत्र्यवीर सावरकर हिमशिखर असे नाव देण्याची प्रक्रिया सर्व सोपस्कार अंतिम टप्प्यात आहे. शिखराच्या पायथ्याशी ‘शिखर सावरकर’ (Mount Savarkar) चा नामफलक लावण्यात करण्यात आला.

शिखर सावरकर पुरस्कार

२०२० पासून ‘शिखर सावरकर पुरस्कार’ सोहळा सुरू करून गिर्यारोहण या साहसी खेळात सावरकर स्मारकाकडून एक नवा पायंडा पाडण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक हे प्रेरणास्थान आहे. मुंबईतील दादर येथे असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक हे शिक्षण, क्रीडा, शारीरिक विकास आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रेरणास्थान आहे. स्मारकात रायफल शूटिंग, बॉक्सिंग, योगा यासह तीसहून अधिक उपक्रम राबवले जातात. वीर सावरकर संस्थानकडून प्रशिक्षण घेतलेल्या विविध खेळाडूंनी आपापल्या क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई केली आहे.

(हेही वाचा दहशतवादाविरोधात SIA ची कारवाई! फुटीरतावादी नेत्याचं घर सरकारनं केलं सील)

२०१९-२०२२ पर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी 

रायफल

  • आंतरराष्ट्रीय – २ सुवर्ण, १ कांस्य
  • राष्ट्रीय – ४ सुवर्ण, ३ रौप्य, ६ कांस्य
  • विद्यापीठ – १ कांस्य
  • राज्यस्तरीय – २ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य
  • जिल्हास्तरीय – ३ सुवर्ण, १ रौप्य

मुष्टियुद्ध 

  • राष्ट्रीय – ४ सुवर्ण, २ रौप्य
  • विद्यापीठ – २ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य
  • राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय – ५ सुवर्ण, २ रौप्य, २ कांस्य

आर्चरी 

  • विद्यापीठ – ५ सुवर्ण, ७ रौप्य, ५ कांस्य
  • राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय – ३ सुवर्ण

तायक्वांदो

  • आंतरराष्ट्रीय – १७ सुवर्ण, ६ रौप्य, २२ कांस्य
  • राष्ट्रीय – ६६ सुवर्ण, ५२ रौप्य, ३४ कांस्य
  • विद्यापीठ – ५० सुवर्ण, ३१ रौप्य, ६७ कांस्य
  • राज्य/जिल्हा – ३४ सुवर्ण, ३० रौप्य, ४५ कांस्य

कराटे 

  • विद्यापीठ – ६ सुवर्ण, ५ रौप्य, ८ कांस्य

कार्यक्षम अधिकारी व्हा, देशसेवा करा

संघ लोकसेवा आयोग (UPSC) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये समर्पित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे वर्ग आयोजित केले जातात. देशाची धुरा सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांमधील निष्ठावंत आणि देशभक्त तरुणांना संधी उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे.

स्वातंत्र्यलढ्याची कहाणी

राष्ट्रीय स्मारकातील लाईट अँड साऊंड शो स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवन संघर्षाचे प्रतिबिंब आहे. हा शो देशातील पहिला थ्रीडी वाॅल मॅपिंग तंत्रज्ञानावर आधारित असा शो आहे. दर आठवड्यात शनिवार-रविवार हे दोन दिवस हा शो विनामूल्य दाखवला जातो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.