स्वामिनी सावरकरांचे निधन : सावरकर विचारांचा मार्गदर्शक आधारस्तंभ ढासळला 

122

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे विक्रमराव सावरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री स्वामिनी सावरकर यांचे मंगळवार, २१ मार्च रोजी पुणे येथील रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे केवळ सावरकर कुटुंबियांचीच नव्हे तर सर्व राष्ट्रभक्तांची अपरिमित हानी झाली आहे, अशी भावना समस्त राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी व्यक्त करत आहेत.

पतीच्या कार्यामध्ये पतीच्या खांद्याला खांदा लावून उभी राहणारी स्त्री असे वर्णन स्वामिनी वहिनींचे करावे लागेल. हिंदू महासभेच्या कार्यात विक्रमरावांसोबत त्या सहभागी होत्या. विक्रमराव जेव्हा अटकेत असायचे तेव्हा त्यांच्या अनुपस्थितही तितक्याच निर्धाराने त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. मुरबाड येथे जी सैनिकी शाळा सुरु करण्यात आली. त्या शाळेच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. त्यामुळे एका कर्तृत्ववान पतीची तेवढीच कर्तृत्वान पत्नी असा उल्लेख स्वामिनी वहिनींचा करावा लागेल. आज त्यांच्या निधनाची आलेली बातमी ही केवळ सावरकर कुटुंबच नव्हे, तर समस्त देशप्रेमींवर हा प्रहार आहे, त्यांना माझी अत्यंत विनम्र आदरांजली.

– डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार. 

स्वर्गीय विक्रम सावरकरांच्या पत्नी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री श्रीमती स्वामिनी सावरकर यांचे वयाच्या ८४व्या वर्षी पुण्यात दुःखद निधन. भावपूर्ण श्रद्धांजली.

– अतुल भातखळकर, आमदार, भाजप.

श्रीमती स्वामिनीताई सावरकर यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळली. त्या सावरकर कुटुंबातीलच असल्यामुळे हिंदुत्व विचारांचा वारसा त्यांना अगदी सहजी आलेला होता. त्या दृष्टीने त्यांचे कार्य आणि मार्गदर्शन चालू असे. त्यांच्या निधनामुळे आमचा मार्गदर्शक आधारस्तंभ ढासळला आहे. रणजित सावरकर यांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. स्वामिनीताईंना माझ्याकडून विनम्र श्रद्धांजली.

– चंद्रशेखर साने, सावरकर अभ्यासक, इतिहासकार. 

(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना मातृशोक )

हिंदू महासभेचे भूतपूर्व अध्यक्ष कैलासवासी विक्रमराव सावरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री स्वामिनी सावरकर यांच्या निधनाने स्वातंत्र्यवीर सावरकर कुटुंबियांची आणि भारताची अपरिमित हानी झाली आहे. स्वामिनीताई धर्मपरायण आणि सत्वशील अशा गृहिणी होत्या. सनातन संस्थेशी त्यांचे आत्मीय संबंध होते. विक्रमराव यांच्यासोबत त्या नेहमी सनातन संस्थेच्या गोवा येथील आश्रमात येत असत. तसेच विक्रमरावांच्या निधनानंतरही त्यांनी बऱ्याचदा सनातनच्या आश्रमात येऊन वास्तव्य केले होते. साधनेची त्यांना रुची होती. सावरकर कुटुंबियांनी केलेल्या अनमोल त्यागामध्ये त्यांचाही मोठा सहभाग होता. आज त्यांच्या मृत्यूमुळे सनातन परिवाराची मोठी हानी झाली आहे. त्यांना ईश्वर पुढील सद्गती देवो, अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो.

– चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.

स्वामिनी सावरकर यांच्या निधनाची बातमी नुकतीच कळली आणि जुन्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. विक्रम सावरकर यांच्या कार्यात त्यांचा सहभाग होता, त्यांचा पाठिंबा होता. प्रज्वलंतचे कार्यही स्वामिनी मावशी विक्रम सावरकर यांच्यासोबत तितक्यात तळमळीने आणि तन्मयतेने करत होत्या. सावरकर कुटुंबियांच्या लिखाणाचा वारसाही त्यांनी जतन केला होता. त्यांच्याशी अनेकवेळा गप्पा मारण्याचा प्रसंग आला. त्याही आमच्या घरी दोन – चार वेळा येऊन गेल्या होत्या. आज त्यांच्या निधनाची वार्ता मनाला दुःख देऊन गेली. आम्ही उभयते पती-पत्नी सावरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो. ही ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

– दुर्गेश परुळकर, सावरकर अभ्यासक आणि व्याख्याते.

स्वातंत्रवीर सावरकर यांचे पुतणे स्वर्गीय विक्रमराव सावरकर यांच्या पत्नी तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री स्वामिनी सावरकर यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी आम्हाला कळली. हा संपूर्ण देशातील राष्ट्रभक्तांसाठी मोठा आघातच आहे. सावरकर कुटुंबियातील प्रत्येक सदस्याने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यात हिरीरीने सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये स्वामिनी सावरकर यांचेही निश्चितपणे योगदान होते. त्यांच्या निधनाने जी अपरिमित हानी झाली आहे ती भरून न येणारी आहे. याप्रसंगी हिंदू जनजागृती समिती आणि तिचे सदस्य सावरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहेत. त्यासोबत सावरकर कुटुंबियांना हे दुःख सावरण्यासाठी शक्ती देवो आणि या पुण्यात्म्याला ईश्वरचरणी स्थान मिळो, अशी आई भगवतीच्या चरणी प्रार्थना करतो.

– रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती. 

(हेही वाचा वीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त शरद पोक्षेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल; म्हणाले, ‘जिवंत समाधी घेणारे शेवटचे युगपुरुष’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.