प. बंगालमधील हिंसा म्हणजे काश्मीर पार्ट – २ ! पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचा इशारा 

81

काश्मीरमधील नरसंहार आणि बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेली हिंसा यांमध्ये बरेच साम्य आहे. काश्मीरमध्ये पूर्वनियोजित नरसंहार झाला होता. त्यासाठी मौलवी, कुराण, दहशतवाद यांचा वापर करण्यात आला. येथील नरसंहार हा जगाच्या तुलनेत सर्वात मोठा होता. बंगालमध्ये १६ ऑगस्ट १९४६ रोजी हुसेन सैय्यद सोराब वर्दी नावाचे संयुक्त बंगालचे मुख्यमंत्री बनले होते. ते मुस्लीम लीगचे होते. तेव्हा हजारो हिंदूंची हत्या करण्यात आली होती. तेव्हा १६ ऑगस्ट १९४६ रोजी रमजान सुरु होता. आणि २ मे २०२१ रोजीही प. बंगालमध्ये हिंसा झाली आणि त्यावेळीही रमजान सुरु होता. हे वहाबी मुसलमान कधीच प्रेषित महंमदाचे झाले नव्हते, त्यांनी त्यांची मुलगी, जावई यांचा खून केला, ते मुसलमान दुसऱ्यांचे काय होणार, असा सवाल हिंदूत्ववादी वक्ते, राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने रविवारी, १६ मे २०२१ रोजी आयोजित केलेल्या वीर सावरकर काळेपानी मुक्ती शताब्दी ऑनलाइन व्याख्यानमालेत समारोपाचे पुष्प गुंफताना पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ बोलत होते. ‘सावरकर की महत्तता’ या विषयावर त्यांचे हे व्याख्यान होते. व्याख्यानानंतर उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरात त्यांनी हे अतिशय परखड आणि डोळ्यात अंजन घालणारे प्रतिपादन केले.

(हेही वाचा : इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती नको असेल, तर वीर सावरकरांना आत्मसात करा! – रणजित सावरकर)

…तर भारतीयांना इस्त्रायली बनावे लागेल!

इस्रायलच्या बाजूने भारत सरकारने बोलावे, त्यांच्या बाजूने उभे राहावे, असे मत अनेकजण विशेष करून हिंदू समाज व्यक्त करीत आहेत. त्यासंबंधात बोलताना पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ म्हणाले कि, इस्रायलमधील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे रात्रं-दिवस इस्राईलसाठी जगत असतात. प्रामाणिक असतात, राष्ट्रवादी वर्तन करत असतात. भारतीयांना जर इस्रायल बनवायचे असेल, तर त्यांना आधी इस्रायली बनावे लागेल. आपल्या पंतप्रधानांनी नेतान्याहू व्हावे, असे वाटत असेल तर समाजाने राष्ट्रवादी बनायला हवे, असेही कुलश्रेष्ठ म्हणाले. त्याबाबत अधिक तपशीलवार माहिती देत ते म्हणाले की, सरकारची आपली कर्तव्ये, जबाबदाऱ्या असतात. आंतरराष्ट्रीय बंधनेही असतात. त्यानुसार इस्रायल- पॅलेस्टिन संबंधात सध्या काय निवेदन करायचे ते ठरत असते. सरकारने आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, तेथे हल्ले होत आहेत, ते थांबवावेत आणि दोन्ही बाजूने संयम पाळावा. पण इस्रायलच्या बाजूने सरकारने बोलावे, इस्रायलच्या पंतप्रधानांसारखा आपला पंतप्रधान असावा, असे आपण बोलत असतो. त्यावर अतिशयय तिखटपणे माहिती देताना इस्रायलमधील लोक कसे जगतात, कसे वागतात, हे सांगत भारतीय समाजातील उणीवांवरही त्यांनी अचूक बोट ठेवले.

(हेही वाचा : ३७० हटवले, तरी इस्लामीकरण सुरुच आहे! अंकुर शर्मांची धक्कादायक माहिती )

प्रत्येक भारतीयाने आत्मपरीक्षण करण्याची गरज!

भारतीय समाजातील सुमारे ३० ते ३५ कोटी लोकसंख्या अशी आहे जी समाजात द्वेष पसरवते, दुफळी माजवते. हा समाज म्यानमार, बांगलादेशातून येणाऱ्या मुसलमानांना भारतात राहाण्यास, स्थिर स्थावर होण्यास मदत करताे, लोकसंख्या वाढवताे. आपल्या देशाची साधनसंपत्ती ते वापरतात. म्हणजेच कोट्यवधी लोक भारतालाच पोकळ करण्याचे काम करीत असतात. आपण इमानदार आहोत का, ते तपासण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आत्मपरीक्षण केले पाहिजे. अशा स्थितीत तुम्ही जर पंतप्रधान झालात, तर तुम्हालाही हीच भूमिका घ्यावी लागेल. अशा स्थितीत नेतान्याहू होता येणार नाही. तुम्ही सरकारला कमकुवत करू नका. सरकारवर सारे काही अवलंबून राहाण्याची मानसिकता घातक असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादासाठी आपण काय करतो, ते प्रत्येकाने लक्षात घ्यायाला पाहिजे. सरकारवर घाबरट आणि कमकुवत लोक अवंलबून असतात, अशीही पुष्टी त्यांनी जोडली.

(हेही वाचा : फुटीरतेची बीजे रुजवणारी मदरसे बंद करावीत! कॅप्टन सिकंदर रिझवी यांचे परखड मत)

वीर सावरकरांचे विचार व्यापक!

स्वातंत्र्यवीर सावरकर हे भौगोलिक आधारावरील हिंदुत्वाला मानत होते, त्यांचे हिंदुत्ववादी विचार पाहाता ते त्यांना जातीव्यवस्था जी जन्माधारित होती, ती मान्य नव्हती. मनुष्य आपल्या कर्माने आपले श्रेष्ठ्त्व वा जात नक्की करतो, असे त्यांचे म्हणणे त्यांच्या विचारातून स्पष्ट होत होते. वीर सावरकर यांची विविध साहित्ये नजर वाचली गेली पाहिजेत. त्या काळातही वीर सावरकर यांनी मांडलेले विचार किती व्यापक होते, ते लक्षात येते, असेही पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ म्हणाले.

(हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे राष्ट्र सुरक्षेचे पिताच- उदय माहुरकर)

अस्तित्वासाठी मुसलमानांची आंदोलन!

दंगे, शेतकरी आंदोलन, सीएए हे पाहाता वीर सावरकर यांचे विचार यातून देशाला वाचवतील का, यावर ते म्हणाले की, जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा लपलेले गद्दार जे व्यवस्थेत, साहित्यक्षेत्रात विविध स्तरात आहेत, ते तुमचे विचार बदलू लागतात, तेव्हा त्यांना त्यांच्या अस्तित्वाला धोका असल्याची जाणीव होऊ लागते. मात्र तोपर्यंत ते गप्प असतात. हे गद्दार मुसलमान दिल्लीत सरकार आले म्हणून घाबरलेले नाहीत, तर हिंदू मूळ अस्तित्व जाणवू लागले आहेत. यामुळे हिंदूंमध्ये एक चैतन्य निर्माण झाले आहे. याला घाबरून हे लोक आता अस्तित्वासाठी अशी आंदोलने करू लागले आहेत.

(हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकरः एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व… वज्रनिश्चयी ‘क्रांतिकारक’ आणि थोर ‘समाजसुधारक’- डॉ. नीरज देव)

हिंदूंच्या नव्या संघटना नको, एकजूट हवी! 

आता हिंदू स्वत:ला हिंदू म्हणवून घेण्यास लाजत नाहीत, ते आपले म्हणणे स्पष्ट मांडू लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जे मुसलमानांचे पूर्वज काही ना काही लालसेपाटी हिंदू धर्मातून मुसलमान धर्मात गेले होते. आता ते जूने हिंदू पुन्हा हिंदूत्वाच्या सोबत येऊ लागले आहेत. इरफान हबीब आणि रोमिला थापर यांनी शिकवलेल्या खोट्या इतिहासाच्या दबावाच्या बुरख्यातून व परिणामातून हिंदू बाहेर पडू लागला आहे. यामुळे ही चेतना निर्माण झाली आहे, असे कुलश्रेष्ठ म्हणाले. वीर सावरकर यांचे विचार आता महाराष्ट्राबाहेरही जात असून लोकांपर्यंत ते पोहोचत आहेत, लोकांना ते समजून घ्यायचे आहे. हिंदू झोपून राहावेत, ते हिंदु-मुस्लिम भाई-भाई या गोंडस मुलाम्याखालील विचारातच अडकून रहावेत, असे कृत्य मुस्लिम करीत असून त्यातून ते आपले इप्सित साध्य करीत आहेत. यामुळेच आता हिंदूंनी जागृत झाले पाहिजे. त्यासाठी आणखी संस्था काढण्याची काही गरज नाही. आज शंभरापेक्षा अधिक हिंदू संघटना आहेत, त्यातून संस्था वाढवल्याने काही साध्य होणार नाही. राष्ट्र चालवण्यासाठी एकजूट हवी, ती हिंदूंनी दाखवली पाहिजे. त्यादृष्टीने आता समाज बदलू लागला आहे, पण अजून त्यासाठी काही वर्षे जावी लागतील, असेही त्यांनी सांगितले. भारतातील घटनाच जातीव्यवस्था वाढवत आहे. आरक्षणाच्या नावाखाली जातीव्यवस्थेला प्रोत्साहन देत आहे. आज समाज  नव्हे, तर भारतीय घटनाच जात विचारत आहे, असे सांगत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी जातिव्यवस्थेवर वीर सावरकर यांनी मांडलेले विचार स्पष्ट केले. शाहीनबाग, मुस्लिम समाज,  कोरोनाची स्थिती, वीर सावरकर आणि त्यांच्यासंबंधात विविध सरकारांनी व्यक्त केलेले विचार, वीर सावरकर यांना गांधीहत्येनंतर अभियोगात अडकवण्याचा केलेला प्रयत्न आदी विषयांनाही यावेळी कुलश्रेष्ठ यांनी आपल्या व्याख्यानातून स्पर्श केला.

(हेही वाचा : गांधी-नेहरूंनी कायम इंग्रजांशी समझोता केला! प्रा. कपिल कुमार यांचे विवेचन)

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी प्रास्ताविक केले. तसेच त्यांनी आणि श्रोत्यांनी प्रश्न विचारून कार्यक्रमाची रंगत वाढवली. सुरुवातीला स्मारकाने तयार केलेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील माहितीपट दाखविण्यात आला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव तथा गणेश दामोदर सावरकर यांची अंदमानातील काळ्यापाण्यातून १९२१ मध्ये सुटका झाल्यानंतर त्यांना रत्नागिरीपर्यंत कसे आणले गेले. रत्नागिरीत आल्यानंतर त्यांनी कोणकोणती कार्ये केली, याचे वर्णन या माहितीपटात करण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.