गांधी-नेहरूंनी कायम इंग्रजांशी समझोता केला! प्रा. कपिल कुमार यांचे विवेचन 

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाद्वारे आयोजित वीर सावरकर काळेपाणी मुक्ती शताब्दीनिमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत प्रा. कपिल कुमार यांनी संबोधित केले. 

170

जे लोक वीर सावरकर यांच्या माफीनाम्याच्या गोष्टी करतात, ती मंडळी एका परिवाराचे भक्त आहेत. त्यांनी कधीही इतिहासाचा अभ्यास केलेला नाही. केवळ एका परिवाराला  खूष करण्यासाठी ते वारंवार हा मुद्दा उचलत असतात. जर ते वीर सावरकर यांच्या त्या पत्राला माफीनामा म्हणत असतील, तर मी त्यांना विचारू इच्छितो कि, कारागृहात जाणे आणि कारागृहातून बाहेर येणे हा द्रोह आहे का? काँग्रेसच्या कोणत्या नेत्याची इंग्रजांनी छळवणूक केली, त्यांच्याकडून कोलू फिरवू घेतला, असा सवाल प्रा. कपिल कुमार यांनी विचारला.

काँग्रेसने सर्वच आंदोलनात इंग्रजांशी समझोता केलेला! 

कोणतेही आंदोलन सुरु करावे आणि त्याविषयीची मागणी पूर्ण न होताच ते आंदोलन संपवणे, हा इंग्रजांशी समझोता नाही का? असा प्रकारे काँग्रेसवाल्यांनी एकामागोमाग एक आंदोलने मागे घेऊन इंग्रजांशी समझोता केला असताना ते काँग्रेसवाले उलट वीर सावरकर यांच्यावर त्यांनी पत्र लिहून समझोता केल्याचा आरोप करतात, काँग्रेसवाल्यांनी असे एक आंदोलन सांगावे ज्यामध्ये गांधींनी इंग्रजांशी समझोता केला नव्हता, असेही प्रा. कपिल कुमार म्हणाले.

(हेही वाचा : फुटीरतेची बीजे रुजवणारी मदरसे बंद करावीत! कॅप्टन सिकंदर रिझवी यांचे परखड मत)

या सर्व प्रसंगात गांधी-नेहरूंनी समझोता केला नव्हता का? 

  • भारत छोडो आंदोलन केले आणि जनतेला इंग्रजांसमोर मार खाण्यास सोडून दिले. विशेष म्हणजे तेव्हा सैनिक अधिक होते, त्यांना महालात ठेवले होते, गांधींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये ठेवले होते, नेहरूंना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवले होते आणि जयप्रकाश नारायण यांना मात्र लाहोरमध्ये कारागृहात २१ दिवस रात्रभर जागे ठेवले होते. जयप्रकाश यांच्याप्रमाणे एका तरी काँग्रेसी नेत्याला इंग्रजांनी यातना दिली होती का? हा समझोता नव्हता का?
  • १९२१ साली गांधींनी आंदोलनात समझोता केला नव्हता का? 
  • १९३०-३१ मध्ये मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी गांधींनी इरवीन यांच्याशी समझोता करताना मिठावरील लावण्यात आलेल्या कराचा उल्लेखही केला नव्हता. हा समझोता नव्हता का?
  • भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासाठी इरवीन यांच्यावर दबाव टाकून त्यांची फाशी रद्द करता आली असती, पण तसे न करणे हा समझोता नव्हता का?
  • वारंवार कौन्सिलची निवडणूक लढायची आणि त्यात प्रवेश करणे हा ब्रिटिश साम्राज्यवादाशी समझोता नव्हता का?
  • जागतिक महायुद्धाच्या वेळी सर्वजण आंदोलन पुकारण्यास सांगत होते, हा आग्रह करणारे सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर होते, फॉरवर्ड ब्लॉक आणि सोशलिस्ट पार्टी होती, त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष करणे आणि युद्धात इंग्रजांना सहाय्य करणे हा समझोता नव्हे का?
  • माउंट बॅटन यांना भारताचा वॉइसरॉय बनवणे हा इंग्रजांशी समझोता नाही का? २
  • २१, २२ जून १९४७ मध्ये गांधींनी जे भाषण केले होते, जे संग्रही आहे. तेव्हा गांधी विचारात कि, आता स्वातंत्र्य मिळत आहे, तर मग नेतृत्व बदलावे का? त्यानंतर ते म्हणतात, We need a Cambridge educated hero boy to deal with the English’ हे त्या व्यक्तीचे मत होते जी स्वदेशीच्या गोष्टी करायची, स्थानिक नेतृत्वाचा आग्रह धरायची. मग हा समझोता नव्हता का?
  • देशाची फाळणी, पाकिस्तानची निर्मिती हा समझोता नव्हता का? गांधीजी, तुम्ही तर म्हणाला होतात, फाळणीसाठी तुम्हाला माझ्या देहावरून जावे लागेल, मग तुम्ही फाळणी का स्वीकारली?
  • जीवनभर जे काँग्रेससाठी लढत राहिले त्या बादशाह गफार खान यांना गिधड्यांच्या हवाली करणे हा समझोता नव्हता का?
  • रेड क्लिफ म्हणायचा कि, मी तर लाहोर भारताला देऊ इच्छित होतो, परंतु त्यानंतर पाकिस्तानात कोणतेही शहर राहण्यासाठी राहिले नसते. त्यामुळे पाकिस्तानला दिले. रेड क्लिफने सीमारेषा आखून सहा महिन्यांत निघून जाणे हा समझोता नव्हता का?
  • १९४७ नंतर जेव्हा काश्मीरमध्ये सेना म्हणायची कि, आम्हाला पाकिस्तान्यांना बाहेर काढू द्यात, त्यांनतर युद्धविराम करावा, तेव्हा नेहरूंनी युद्धविराम करणे हा समझोता नव्हता का? पाकव्याप्त काश्मीर बनवू देणे, हा समझोता नव्हता का?

(हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे राष्ट्र सुरक्षेचे पिताच- उदय माहुरकर)

असेही होते षडयंत्र!  

अहमदनगर येथील किल्ल्यात जिथे २२-२३ काँग्रेसी नेत्यांना ठेवण्यात आले होते, त्यामध्ये सीतारामैय्या, मौलाना आझाद, सरदार पटेल यांच्या खोली बाहेर आजही फक्त पाटी लावण्यात आली आहे, परंतु ज्या खोलीत नेहरूंना ठेवण्यात आले होते, त्यामध्ये नेहरूंचे कपडे टांगलेले आहेत, ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ ठेवण्यात आले आहे, नेहरूंचा मोठा फोटो लावण्यात आला आहे, त्यांचा बिछाना आहे. गांधी-नेहरू घराणे गैर काँग्रेसी दूरच कोणत्या काँग्रेसी नेत्यालाही मोठे होऊ दिले नाही. काय हाच इतिहास आहे का?, असेही प्रा. कपिल कुमार म्हणाले.

डायरला माफी देण्याचा अधिकार कुणी दिला? 

जनरल डायरलाही गांधींनी क्षमा केली होती. गांधींना हा अधिकार कुणी दिला होता? त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला देश विसरणार का? ही मंडळी जनतेच्या गोष्टी करतात, वास्तवात त्यांच्या घरात कुणीही हुतात्मा झालेला नाही. त्यांच्या परिवारातील कुणालाही पकडून यातना देण्यात आलेल्या नाहीत, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकरः एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व… वज्रनिश्चयी ‘क्रांतिकारक’ आणि थोर ‘समाजसुधारक’- डॉ. नीरज देव)

 गांधींनी स्वातंत्र्य नाकारले!

जेव्हा संपूर्ण स्वातंत्र्याची गोष्ट आली तेव्हा नेताजी सुभाष चंद्र बोस पुढे आले, त्यावेळी गांधीजी म्हणतात कि, अजून भारत संपूर्ण स्वातंत्र्य घेण्यास सक्षम नाही. कोणत्या देशाला स्वातंत्र्य घेण्यासाठी तयारी करावी लागते? मग १९४७ मध्ये देश तयार होता का? त्यावेळी तर देशात जातीय दंगली सुरु होत्या. त्या वातावरणात फाळणीची मागणी होत होती. त्यावेळी भारत स्वातंत्र्य मिळवण्यास तयार होता का?, असेही प्रा. कपिल कुमार म्हणाले.

पंडित माउंट बॅटन या नावाचा जयघोष झाला!  

ज्याने भारतात अत्याचार केले, त्या व्यक्तीला भारताचा गव्हर्नर बनवण्यात आला. त्याला रातोरात माउंट बॅटन बनवले. १५ ऑगस्ट रोजी पंडित माउंट बॅटन या नावाचा जयघोष करण्यात आला. आझाद हिंदचे जेव्हा खटले सुरु होते, तेव्हा सगळा देश एका बाजूला उभा होता. इंग्रजांनी जाणीवपूर्वक त्यात सहगल, ढिल्लो आणि शाहनवाज असे एक हिंदू, एक शीख आणि एक मुस्लीम टाकले होते. या देशात किती एकता आहे हे दर्शविण्याचा प्रयत्न केला होता, असेही प्रा. कपिल कुमार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.