स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांना शुक्रवारी, ९ एप्रिल रोजी मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रणजीत सावरकर यांची प्रकृती स्थिर!
रणजीत सावरकर यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांची आधी अँटिजेन चाचणी करण्यात आली, ही चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली, तीदेखील पॉझिटीव्ह आल्यामुळे रणजीत सावरकर यांना पुढील उपचाराकरता मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आणि सुधारत आहे. विशेष म्हणजे रणजीत सावरकर यांनी २ आठवड्यांपूर्वीच कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती. रणजीत सावरकर यांना कोरोना झाल्याने त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
(हेही वाचा : लसीकरण : महाराष्ट्राची हेळसांड! )
Join Our WhatsApp Community