ताडोबा बफर क्षेत्रात चार बछडे आढळले मृतावस्थेत

84

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील शिवनी वनपरिक्षेत्रात वाघाचे चार बछडे मृतावस्थेत आढळून आले आहेत. यामुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.

( हेही वाचा : राज्यपाल चुकीचे बोलले; आम्ही ‘त्या’ वक्तव्याशी सहमत नाही – आशिष शेलार)

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफरच्या शिवनी वनपरिक्षेत्रात वनकर्मचारी गस्तीवर असताना वाघिणीचे चार बछडे मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. मोठ्या वाघाने या चार बछड्यांवर हल्ला केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. यात दोन नर आणि दोन मादी बछड्यांचा समावेश आहे. बछड्यांच्या शरीरारवरील जखमा पाहता त्यांना नर वाघाने चावा घेतल्याचे दिसून येत असल्याची माहिती वनाधिका-यांनी दिली.

दरम्यान तपासणी केल्यानंतरच मृत्यूचे अधिकृत कारण समोर येईल, असे सांगितले जात आहे. घटनास्थळापासून अगदी तीन किलोमीटर अंतरावर दोन दिवसांपूर्वी वार्धक्यामुळे टी-७५ या वाघीणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. शिवनी बफर क्षेत्रात अजून एका वाघिणीचा वावर असल्याने बछडे नेमके कुणाचे याचा शोध सुरु असल्याची माहिती वनाधिका-यांनी दिली. मृत वाघीणीच्या डीएनए चाचणीच्या अहवालानंतर बछडे तिचे आहेत की नाही, याची माहिती मिळेल, असेही वनाधिका-यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.