ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यानंतर सुरु झाल्यावर तब्ब्ल महिन्याभरानंतर पर्यटकांची आवडती माया वाघीण आता दिसू लागली आहे. सोमवारी मायाचा तिच्या बछड्यासोबतचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हारायल झाला. मायाने पाचव्यांदा बछड्याला जन्माला घातल्याची सुखद वार्ता पर्यटकांना मिळाली.
( हेही वाचा : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश)
आईची "माया" @MahaForest @SMungantiwar #tadoba #tigress #cubs #chandrapur#Vidarbha #nagpur #tadoba_andhari_national_park pic.twitter.com/Djtlm9k2sv
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) November 2, 2022
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात माया ही सर्वात प्रसिद्ध वाघीण आहे. दहा वर्षांच्या मायाने आतापर्यंत पाच बछड्यांना जन्म दिला आहे. पहिल्यांदा तिचे तिन्ही बछडे जगले नाहीत. त्यानंतर तिचे काही बछडे आता उमरेड – कऱ्हाडला नव्या प्रदेशाच्या शोधात पोहोचले. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मायाने स्वाती ढुमरे या महिला वनरक्षकावर हल्ला केला. या हल्ल्यात स्वाती ढुमरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ‘माया’ चर्चेत आली होती. या घटनेनंतर व्याघ्रगणनाही बंद करण्यात आली होती. यंदा पावसाळ्यानंतर तिने पुन्हा बछडे जन्माला घातल्याचे पाहताच वन्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
Join Our WhatsApp Community