मुंबईतील ताज हॉटेलवर २००८ रोजी झालेल्या २६/११ या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी (Tahawwur Rana) तहव्वूर राणा संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यानुसार आता लवकरच दहशतवादी तहव्वूर राणाला भारतात आणले जाऊ शकते. अमेरिकेतील न्यायालयाने राणाची रिट याचिका म्हणजेच प्रत्यक्षीकरण याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे अमेरिकेकडून राणाला भारताकडे प्रत्यार्पण करण्यास (भारताकडे सोपवण्यास) हिरवा झेंडा मिळू शकतो.
मात्र, राणाने (Tahawwur Rana) सध्या न्यायालयाच्या निकालाविरुद्ध अमेरिकेच्या नौवें सर्किट न्यायालयात अपील केले आहे. त्यात त्याने सुनावणीपर्यंत आपल्याला भारताकडे न सोपवण्याची मागणी केली आहे.
(हेही वाचा – NCP : ‘महाराष्ट्र परिक्रमे’चे नेतृत्व द्यायचे कोणाकडे?; राष्ट्रवादीत धुसफूस)
कोण आहे तहव्वूर राणा?
तहव्वूर राणा (Tahawwur Rana) हा मुळचा पाकिस्तानी कॅनडियन व्यावसायिक आहे. तो पाकिस्तानच्या लष्करात अनेक वर्ष डॉक्टर म्हणून कार्यरत होता. नंतर त्याने कॅनडा येथे स्थलांतर केले. त्याला कॅनडाचे नागरिकत्व मिळाले आहे. मुंबईतील ताज हॉटेलवर २६/११/२००८ मध्ये झालेल्या हल्ल्यातील तो एक आरोपी असल्याचे सिद्ध झाले तेव्हापासून त्याचे देशाच्या मोस्ट वॉण्टेड लिस्टमध्ये नाव नोंदवले गेले आहे.
राणा (Tahawwur Rana) याला अमेरिकेने अटक करून २०११ मध्ये, लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटाला पाठिंबा दिल्याबद्दल आणि डॅनिश वृत्तपत्र Jyllands-Posten वर हल्ल्याचा कट रचल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आहे. मात्र, अमेरिकेतील न्यायालयाने त्याला भारतातील २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपात दोषी मानलेले नाही. अशातच भारताने राणावर दिल्ली न्यायालयात खटला चालवण्यासाठी अमेरिकेकडे त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे.
युनायटेड स्टेट्स डिस्ट्रिक्ट जज ने फेटाळली रिट याचिका
अमेरिका शहरातील कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टच्या युनायटेड स्टेट्स डिस्ट्रिक्ट जज डेल एस फिशरने २ ऑगस्ट रोजी राणाची (Tahawwur Rana) याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने त्यांच्या आदेशात म्हटले आहे की राणाची बंदी प्रत्यक्षीकरणाची रिट याचिका फेटाळण्यात आली आहे. दरम्यान राणाने या निर्णयाविरुद्ध नौवें सर्किट न्यायालयात अपिल केले आहे. तसेच सुनावणी पर्यंत त्याला भारताकडे सोपवले जाऊ नये अशी मागणी त्याने या याचिकेत केली आहे.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community