तैवानची राजधानी (Taiwan Earthquake) तैपेई येथे बुधवारी, (३ एप्रिल) जोरदार भूकंपाने हादरली. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.५ इतकी होती. हा भूकंप इतका शक्तिशाली होता की, यानंतर तैवान आणि जपानमध्ये सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. गगनचुंबी इमारतीही पत्त्याप्रमाणे कोसळल्या आहेत. या भूकंपात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
तैवानच्या हुआलियनमधून भूकंपाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये इमारती कोसळताना दिसत आहेत. भूकंपामुळे तैवानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर देशभरातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. या भूकंपाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ५ मजली इमारत झुकल्याचे दिसत आहे. गेल्या २५ वर्षांतील हा शक्तिशाली भूकंप असल्याची माहिती समोर आली आहे.
भूकंपामुळे अनेक शहरांचा वीजपुरवठा खंडित झाला होता तसेच येथील इंटरनेट सेवेवरही या भूकंपाचा परिणाम झाल्या. लोक इमारतींमध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान या भूकंपामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
#WATCH | An earthquake with a magnitude of 7.2 hit Taipei, the capital of Taiwan.
Visuals from Beibin Street, Hualien City, Hualien County, eastern Taiwan.
(Source: Focus Taiwan) pic.twitter.com/G8CaqLIgXf
— ANI (@ANI) April 3, 2024
(हेही वाचा – Pune : राज्यात २२ हजार बंद्यांनी घेतला ई-मुलाखत सुविधेचा लाभ )
भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा
तैवानमधील भूकंपानंतर जपानमध्ये सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. ओकिनावा प्रांताच्या आसपासच्या किनारी भागासाठी सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या सुनामी लाटा तीन मीटरपर्यंत उंच असू शकतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community