जगातील आश्चर्यांपैकी एक असलेला ताज महाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ताज महालाला कर थकबाकीची नोटीस मिळाली आहे. जागतिक वारसा म्हणून ओळखल्या जाणा-या या वास्तूला पाणी आणि मालमत्ता कराच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. एएसआयचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ राज कुमार पटेल यांनी ही माहिती दिली आहे.
15 दिवसांची नोटीस, अन्यथा ताज महाल जप्त होणार
मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा महानगरपालिकेने ताज महालासाठी पाठवलेल्या थकबाकीच्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, जर 15 दिवसांत थकीत कर जमा केला नाही तर ताज महाल जप्त केला जाईल. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे एएसआय राज कुमार पटेल म्हणतात की, स्मारकांवर मालमत्ता कर लागू होत नाही. ताज महालाचा कोणाताही व्यावसायिक वापर नसल्यामुळे पाण्यावर कर भरण्यास आम्ही जबाबदार नाही. हिरवळ टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने येथे पाण्याचा वापर केला जातो.
( हेही वाचा: ‘कोस्टल’ शेजारील झोडपट्ट्यांमधील शौचालयांमध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी )
ताज महालासाठी पहिल्यांदाच अशी नोटीस
ताज महालासाठी पहिल्यांदाच अशी नोटीस आली आहे. ASI अधिका-यांनी सांगितले की, ताज महालाला 1920 मध्ये संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले होते आणि ब्रिटिश राजवटीतही या स्मारकावर कोणताही कर किंवा पाणी कर लावला गेला नव्हता.
Join Our WhatsApp Community