या पाच गावांसाठी ‘ताजमहल’ ठरतोय श्राप!

95

जगातील सात आश्चर्यांपैकी ताजमहल एक आहे. या संगमरवरी वास्तू तथा इमारतीच्या सौंदर्याची जगभरात प्रशंसा केली जाते. मात्र ही जगप्रसिद्ध वास्तू 5 गावांसाठी श्राप ठरली आहे. ताजमहालाची सुरक्षा वाढवल्यामुले या पाच गावातील गावक-यांच्या अडचणी खूप वाढल्या आहेत. त्यामुळे या गावांमध्ये राहणा-या नागिरकांच्या घरी ना नातोवाइकांना येणे शक्य आहे, ना गावातील तरुणांसाठी लग्नाचे स्थळ येत आहे. त्यामुळे या गावांतील 40 टक्के तरुण अद्यापही अविवाहित आहेत.

या गावांसाठी ताजमहाल ठरतोय श्राप

गढी बांगस, नागला पायमा, तालफी नागल, अहमद बुखारी आणि नागला धिंग,या गावांचा मार्ग ताजमहालाच्या बाजूला जातो. त्यामुळे 1992 पासून या ग्रामस्थांचा त्रास वाढला आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ताजमहालची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या गावांमध्ये जाणा-या व्यक्तीला प्रशासनाकडून पास घेणे आवश्यक आहे. गावातील लोकांकडे आधीच पास आहे, परंतु त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येक वेळी गावात आल्यावर नवीन पास काढावा लागतो.

तरुणांची लग्नेही होईनात

ताजमहालापासून या गावांकडे जाणा-या मार्गावर चेक पाॅइंट बनवण्यात आले आहेत. त्यांच्या घरी आलेल्या नातेवाईकाला इथे बोलावले जाते. त्यानंतरच त्यांना गावात प्रवेश दिला जातो. या ग्रामस्थांच्या नातेवाईकांना कोणत्याही शुभ कार्यक्रमाला जाता येत नाही. त्यामुळे गावातील 40 ते 45 टक्के तरुण बॅचलर म्हणून उरले आहेत. 1992 मध्ये ताजमहाल सर्वोच्च न्यायालयाने निगराणीखाली घेतल्यानंतर, या गावांतील नागरिकांना शहरात जाण्यासाठी दसरा घाटाजवळील नागला पायमा पोलीस चौकीतून जावे लागते. तसेच, 10 किमी चालत जावे लागते आणि धुंदुपुरातून जावे लागते. या गावांच्या वाटेवर सकाळ -संध्याकाळ थोडा वेळी बॅटरी रिक्षा दररोज चालवण्यास परवानगी दिली जाते.

( हेही वाचा: शिवसेनेलाही हनुमान भावला! सभेच्या आधी बाईक रॅलीत हनुमान )

त्यावेळी घरातच कैद राहावे लागते

या गावातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास, एखादी महिला गरदोर राहिल्यास अडचण वाढते. याशिवाय रात्री महिन्यातील पाच दिवस रात्री ताजमहाल पाहण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव या ग्रामस्थांना घरातच कैद राहावे लागते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.