इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले तळेगाव-दाभाडे ! (Exploring the Beauty of Talegaon Dabhade Maharashtra) छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती खंडेराव दाभाडे, सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचे अतुलनीय योगदान या गावाला लाभलं आहे. खंडेरावांचे वडील येसाजीराव बजाजी दाभाडे (पाटील) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वामिनिष्ठ सेवक होते. महाराजांनीच मावळमधील तळेगाव हे त्यांना वतन दिल्यामुळे या गावाचं नाव तळेगाव-दाभाडे असं पडलं. साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय पार्श्वभूमी लाभलेली अनेक पर्यटन स्थले या गावात पाहायला मिळतात तसेच हे एक निसर्गरम्य ठिकाणही आहे.
तळेगाव-दाभाडे (Talegaon Dabhade) पुण्यापासून सुमारे ३८ किमी. अंतरावर आहे, तर चाकणपासून २० किमी अंतरावर आहे. येथे दोन मोठी, तर एक लहान तळं आहे. गावामध्ये डोळसनाथंचे मंदिर आहे. या मंदिराजवळ श्रीमंत सरसेनापती खंडेराव दाभाडे सरकार यांचा वाडा आहे. वाड्याच्या मागच्या बाजूला श्री बनेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराजवळ सरसेनापती उमाबाईंची समाधी आहे.
(हेही वाचा – Fire : फटाके उडवताना ठाण्यात गुहसंकुलाच्या पार्किंगला आग, १६ वाहने जळून खाक )
हर्णेश्वर टेकडी, पांडवकालीन मंदिर, निसर्गरम्य बाग, श्री बालाजी मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर ही स्थळे प्रेक्षणीय आहेत. तळेगाव हे पुर्वीपासून इथल्या आरोग्यदायी हवेमुळे आणि थंड वातावणामुळे प्रसिद्ध आहे. हाच गारवा आणि स्वास्थ्याला पूरक हवामान अजूनही इथे टिकून आहे. तळेगाव शहर थंड असण्याचं आणखी एक कारण म्हणजे इथली हिरवळ, वृक्षसंपदा, सह्याद्रीच्या पर्वतरांगानी वेढलेलं तळेगाव शहर हिरवळीने सतत फुललेलं असतं. त्यामुळे डोळ्यांना शांतता देणारं निसर्गरम्य दृश्य आणि मनाला आणि शरिराला शांतता देणारा थंडावा देतात. येथील बहरलेल्या निसर्ग आणि धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी हल्ली येथे पर्यटकांचा ओढा वाढला आहे.
श्री चौराईमाता मंदिर, श्री क्षेत्र भंडारा डोंगर, श्री हर्णेश्वर टेकडी इत्यादी ठिकाणी देवदर्शनासाठी पर्यटक येथे येतात. येथील विलोभनीय दृष्ट नजर खिळवून टेवतात. डोंगर, माळरान, पठारावर चरणारी जनावरे, हिरवागार निसर्ग, आल्हाददायक गारवा असे मनोहर दृष्य या ठिकाणी अनुभवता येते. लोणावळा, खंडाळा, कार्ला, भांजे, मळवली पवनानगर इत्यादी ठिकाणे येथून जवळच असल्यामुळे पर्यटक तळेगाव-दाभाडे या महाराष्ट्रातील निसर्गरम्य ठिकाणाला भेट देतात. मक्याची कणसे, भुईमुगाच्या शेंगा, भजी, वडापाव, भेळ…या प्रकारचे व्यवसाय येथे चालतात.
घोरावडेश्वराचा डोंगर, अमरजाई देवी, महादेवाचे पांडवकालीन प्राचीन शिवमंदिर, लांबून लक्ष वेधून घेणारा बिर्लाचा गणपती, प्रतिशिर्डी, चौराईची देवी…. अशी असंख्य पर्यटन स्थळे येथे पाहायला मिळतात. चौराईचा डोंगर पावसाळ्यात हिरवा गडद झालेला असतो. या डोंगरावर असंख्य औषधी वनस्पती आहेत. ज्येष्ठ लेखक गो.नि. दांडेकर या गावात राहात होते. येथे मिळणाऱ्या रानभाज्या अनेक आजारांवर रामबाण उपाय करतात.
मावळ तालुक्यातून जाण्याचा मार्ग…
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे हे पुण्यापासून सुमारे ४० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून अगदी जवळ असल्याने स्वतःची गाडी असेल तर उत्तमच परंतु येथे जाण्यासाठी आपण मुंबई-पुणे महामार्गावरील ‘बेगडेवाडी’ स्टेशन येथे उतरून देखील ‘कुंडमळा’ येथे जाऊ शकता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community