एलाॅन मस्कच्या ऑफरचा तालिबानी घेताहेत फायदा; कट्टरपंथीयांचे ट्वीटर अकाऊंट व्हेरिफाईड

एलाॅन मस्क यांनी ट्वीटर खरेदी केल्यापासून अनेक मोठे बदल केले. एलाॅन मस्क यांनी ब्लू टिक विकण्याचे फर्मान काढले. कोणालाही ब्लू टिक फूकट मिळणार नाही, त्यासाठी पैसे मोजावे लागतील, असे एलाॅन मस्ककडून सांगण्यात आले. त्याचाच फायदा आता अफगाणीस्तानमधील कट्टरपंथी घेताना दिसत आहेत. तालिबानी पैसे देऊन ब्लू टीक विकत घेत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, ट्वीटर पेड व्हेरिफिकेशन बॅजसाठी अनेक तालिबानी नेते अर्ज करत आहेत. याचा अर्थ नियमाप्रमाणे पैसे दिल्यानंतर त्यांच्या अकाऊंटला ब्लू टिक मिळेल. सध्या तालिबानचे दोन अधिकारी आणि अफगाणिस्तानमधील कट्टर इस्लामवादी समूहाच्या चार समर्थकांचे ट्वीटर हॅंडल व्हेरिफाईड झाले आहे. त्यांना ब्लू टिक मिळाली आहे. तालिबानच्या एक्सेस टू इन्फाॅर्मेशन विभागाचे प्रमुख हिदायतुल्लाह हिदायत याचे अकाऊंट व्हेरिफाईड झाले आहे.

( हेही वाचा: मोठी बातमी: राज्यातील कत्तलखान्यांवर आयकर विभागाची छापेमारी )

ब्लू टिकची योजना आहे तरी काय?

एलाॅन मस्क यांनी ट्वीटरची मालकी मिळवल्यानंतर अनेक नवनवीन निर्णय घेतले. मोठ्या प्रमाणात कर्मचा-यांची कपात केली. त्यानंतर ब्लू टिक फीचर विकत घेण्याची सुविधा सुरु केली. ब्लू टिकसोबत इतरही प्रिमियम फिचर्स यामध्ये युजर्सना मिळत आहेत. याआधी ब्लू टिक केवळ समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांना मिळत होते, त्यावरुन त्या त्या अकाऊंटची सत्यता कळून यायची. कुणीही पैसे देऊन ब्लू टिक विकत घेऊ शकत नव्हते. मात्र, एलाॅन मस्कच्या धोरणांमुळे आता कट्टरपंथीयांदेखील ही ब्लू टिक मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here