दक्षिण भारतीय चित्रपट (South Indian movies) हे जागतिक दर्जाचे असतात, अशी चर्चा रंगू लागली आहे. आज दक्षिण भारतीय चित्रपट (South Indian movies) बॉलिवुडलाही मागे टाकत आहेत. त्यामध्ये तामिळ सिनेसृष्टी (Exploring the Global Impact of Tamil Actors in Cinema) अव्वल दर्जाची मानावी लागेल. तामिळ कलाकार (tamil actor) देखील आपल्या अभिनयासाठी आणि उत्कृष्टतेसाठी जगभरात ओळखले जातात. आज जगाशी स्पर्धा करायची असेल तर दक्षिण भारतीय विशेषतः तामिळ चित्रपटाशी ते स्पर्धा करु शकतात. (Tamil Actor)
तामिळ सिनेमाला ’कॉलीवुड’ म्हणूनही ओळखले जाते. कोडंबक्कम, चेन्नईतील एक ठिकाण आहे ज्यावरुन कॉलिवुड हे नाव आले आहे. पहिला तामिळ मूक चित्रपट, कीचाका वधम १९१८ मध्ये आर. नटराज मुदलियार यांनी दिग्दर्शित केला होता. कालिदास हा पहिला तामिळ बोलपट एच. एम. रेड्डी यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट १९३१ रोजी प्रदर्शित झाला. (Tamil Actor)
(हेही वाचा – Dadar Ranade Road हातगाड्यांनी अडवला; शुन्य नंबरच्या नावाखाली वाढल्या ‘या’ गाड्या)
हे दोन कलाकार निभावतात आघाडीची भूमिका
१९३५ रोजी आलेला नंदनार हा अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक एलिस आर. डुंगन यांचा पहिला चित्रपट होता. म्हणजे एका अमेरिकन दिग्दर्शकाने देखील तामिळ चित्रपटसृष्टीची (Tamil Cinema) क्षमता सुमारे ९० वर्षांपूर्वीच ओळखली होती. १९३७ मध्ये प्रदर्शित झालेला बालयोगिनी हा दक्षिण भारतातील पहिला बालचित्रपट (Children’s movies) मानला जातो. मनोरमा इयरबुक २००० ने असा दावा केला आहे की २० व्या शतकात ५,००० हून अधिक तामिळ चित्रपटांची निर्मिती झाली आहे. तामिळ चित्रपट (Tamil Cinema) देखील इतर भाषांमध्ये डब केले गेले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आहेत. (Tamil Actor)
कमल हसल, रजनिकांत यांनी तर तामिळ सिनेसृष्टी व्यापून टाकली आहे. आजही उतार वयात हे दोन कलाकार आघाडीची भूमिका निभावत असताना तामिळ चित्रपटाला (Tamil Cinema) नवी ओळख प्रदान करत आहेत, त्याचबरोबर सथ्यराज, विजयकुमार, विजयन, सरथ बाबू हे देखील त्यांचे समकालीन कलाकार आहेत. (Tamil Actor)
(हेही वाचा – Hotels in Mussoorie Mall Road : मसुरी मॉल रोडवरील ‘या’ टॉप लक्झरीयस हॉटेल्सना तुम्ही भेट दिली का ?)
तामिळ कलाकारांच्या यशामागील ‘हे’ आहे कारण
आजच्या काळातील सर्वोत्कृष्ट तामिळ कलाकार (tamil actor) म्हणजे विजय, अजिथ कुमार, सूर्या, आर. माधवन, धनुष, विजय सेथुपथी, विक्रम प्रभू या दिग्गज कलावंतांनी जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण केली. मात्र जगाशी स्पर्धा करत असताना त्यांनी मातीशी असलेले घट्ट नाते कधी सोडले नाही. त्यांनी आपली संस्कृती दाखवली आणि जगाने तिचा स्वीकार केला. (Tamil Actor)
पोन्नियन सेल्वन, कबाली, विक्रम वेधा, २.०, काला, सरकार, ९६, विश्वरुपम, कैथी, असुरन, जेलर, लीओ, पोर थोझिल, कॅप्टन मिलर असे अनेक चित्रपट जगाशी स्पर्धा करायला आणि जगात प्रभाव पाडायला सज्ज झाले. तामिळ कलाकारांच्या (Tamil Actor) यशामागील आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे शिस्त आणि शिष्टाचार. त्यामुळे अशा अनेक गुणांच्या बळावर हे कलाकार जागतिक प्रभाव निर्माण करु शकले. (Tamil Actor)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community