Target Killing: काश्मीरच्या पुलवामामध्ये पोलीस उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी एका पोलीस उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली. घरात घुसून पोलीस उपनिरीक्षकाची (पोलीस सबइन्स्पेक्टर) हत्या करण्यात आली. गोळी झाडली तेव्हा तो घरात झोपला होता. या घटनेनंतर परिसरात एकच भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला असून उपनिरीक्षकाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

(हेही वाचा – मुंबईकरांनो पार्किंगचं नो टेन्शन…आता कुठेही गाडी उभी कऱण्याची गरज नाही)

घरात घुसून झाडल्या गोळ्या

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक फारुख अहमद मीर यांच्यावर शुक्रवारच्या मध्यरात्री पंपोर भागातील सांबुरा येथे हल्ला झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मीर सीटीसी लेथपोरा येथे आयआरपी 23 व्या बटालियनमध्ये तैनात होते. शुक्रवारी रात्री ते घरी झोपला असताना काही चेहरा झाकलेले दहशतवादी त्याच्या घरात घुसले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडून पळून गेले.

बँकेत, शाळेत घुसून गोळीबार

2 जून रोजी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात बँक मॅनेजर विजय कुमार यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेनेही खळबळ उडाली. दहशतवाद्यांनी बँकेत घुसून बँक व्यवस्थापकाला लक्ष्य केले होते. 31 मे रोजी, बँक मॅनेजरच्या हत्येच्या दोन दिवस आधी, दहशतवाद्यांनी कुलगाममधील सरकारी शाळेत जम्मू विभागातील सांबा जिल्ह्यातील रहिवासी, हिंदू शिक्षिका रजनी बाला यांची गोळ्या झाडून हत्या केली. तर यापूर्वी 12 मे रोजी बडगाम जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयात लिपिक राहुल भट यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. एका महिन्यात दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये 8 टार्गेट किलिंग केल्याचे सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here