‘रसना गर्ल’ ; जन्म, मृत्यू, वय आणि १४चा आकडा

144

मनोरंजन क्षेत्रात अनेक बालकलाकार आहेत, ज्यांनी त्यांचा प्रभाव कोट्यवधींवर पाडला होता. अशाच कलाकारांमध्ये एक अशीही बालकलाकार होती, ज्या कलाकाराने बालवयातच प्रसिद्धीची उंची गाठली, चित्रपटसृष्टीतही स्वतःचा ठसा उमटवला, परंतु हे यश फार काळ अनुभवता आले नाही. अशा या कलाकाराचे नाव आहे तरुणी सचदेव. ‘आय लव्ह यु रसना’ हा जाहिरातीतील संवाद अनेकांना त्यांचे बालपण आठवून देते. अशा या ‘रसना गर्ल’चा जन्म १४ मे १९९८ रोजी झाला आणि मृत्यू १४ मे २०१२ रोजी झाला, विशेष म्हणजे या ‘रसना गर्ल’चे आयुष्यही १४ वर्षांचे होते. असा जन्मापासून मृत्यूपर्यंत ‘रसना गर्ल’चा १४ आकड्यांभोवती फिरणारा प्रवास विलक्षण ठरला.

बालवयात प्रसिद्धीची उंची गाठली 

मुंबईत जन्मलेल्या तरुणी सचदेव हिच्या छोट्याशा डोळ्यामध्ये गरुड झेप घेण्याची ईच्छा होती. ज्या वयात मुले खेळतात, अभ्यास करतात, त्या वयात या ‘रसना गर्ल’ने प्रसिद्धीची उंची गाठली होती. तिची आई गीता सचदेव ह्या मुंबईतील इस्कॉन या मंदिरात कायम जात आणि श्रीकृष्णाची भक्ती करत असत. तरुणी सचदेव हीदेखील सणासुदीच्या दिवसांत इस्कॉन मंदिराच्या मार्फत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात अवश्य सहभाग घेत असत. तरुणी सचदेव अवघी ५ वर्षांची असताना चित्रपटसृष्टीत आली. त्यानंतर तिने ‘रसना’, ‘कोलगेट’, आयसीआयसीआय बँक’, ‘रिलायन्स मोबाईल’, गोल्ड विनर’, ‘शक्ती मसाला’ यांसारख्या टीव्ही वरील जाहिरातींमध्ये झळकली, पण ‘रसना’ च्या जाहिरातीतील तिचा ‘आय लव्ह यु रसना’ हा संवाद वर्षानुवर्षे स्मरणात राहिला. तरुण सचदेव हिने बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘पा’ या चित्रपटातही तरुणी सचदेव हिने काम केले होते. याशिवाय तिने मल्याळम भाषेतील चित्रपटातही काम केले आहे.

rasana1

(हेही वाचा धक्कादायक! भायखळ्याच्या सेंट अँड्र्यूज शाळेकडून उन्हाळी सुटीत ख्रिस्ती धर्मप्रसार)

मित्र-मैत्रिणींशी भेटताना मृत्यूची मिळालेली पूर्वकल्पना 

ज्या १४ मे रोजी तरुणीचा जन्म झाला, त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. १४ मे २०१२ रोजी तरुणी ही तिची आई गीता हिच्यासोबत नेपाळ येथे जात होती. मात्र ज्या विमानातून त्या प्रवास करत होत्या, त्या विमानाला भीषण आग लागली आणि त्यातच दोघींचा होरपळून मृत्यू झाला. विशेष म्हणजे आपल्या मृत्यूची पूर्वकल्पना ‘रसना गर्ल’ला मिळाली होती, त्यामुळे तिने नेपाळला जाण्यापूर्वी आपल्या मित्रांची गळाभेट घेत, मी तुम्हाला शेवटची भेटत आहे, असे म्हटले होते.

rasana2

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.