स्टँड अप कॉमेडियन मुनावर फारुखी याने ट्वीट करत, आपण काॅमेडिअन म्हणून प्रवास संपवत असल्याचं सांगितलं तेव्हा अनेक तथाकथित लोक त्याच्या समर्थनासाठी पुढे आले.आता या पार्श्वभूमीवर मुस्लिम विचारवंत आणि साहित्यिक तस्लीमा नसरीन यांनी या तथाकथित निधर्मवाद्यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत ट्ववीर हॅंडलवरुन ट्वीट करत म्हटले की, मुनावरच्या समर्थनार्थ गळा काढणा-यांनी माझ्याही स्वातंत्र्यावर बोलावे.
नसरीन यांचं ट्विट
मी सोशल मीडियावर मुनावर फारुकी यांच्या भाषण स्वातंत्र्याचे रक्षण करणारे लेख आणि विधाने लिहिली. पण मुनावर फारुकी यांच्या भाषण स्वातंत्र्याचे समर्थन करणारे बहुतांश लोक माझ्या भाषण स्वातंत्र्याचे समर्थन करत नाहीत. अशा आशयाचं त्यांच हे ट्वीट आहे.
I wrote articles and statements on social media defending Munawar Faruqui's freedom of speech. But the most people who support Munawar Faruqui's freedom of speech, do not support my freedom of speech.
— taslima nasreen (@taslimanasreen) December 11, 2021
काय आहे प्रकरण
स्टँड अप कॉमेडियन मुनावर फारुखी याने या आधी त्याच्या कार्यक्रमातून कायम हिंदू देवदेवता, धर्मग्रंथ यांच्यावर अश्लाघ्य विनोद निर्मिती करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्याचाच परिणाम म्हणून त्याचे होणारे कार्यक्रम हिंदू संघटनांनी रद्द केले. आपल्या रद्द होणा-या कार्यक्रमांवर एक भावूक पोस्ट शेअर करत मुनावरने मी काॅमेडियन म्हणून माझा प्रवास संपवत असल्याचं सांगितलं. त्याच्या या घोषणेनंतर त्याला स्वरा भास्कर समवेत अनेक तथाकथित लोकांकडून समर्थन मिळाले.
( हेही वाचा 13 डिसेंबर! काळा दिवस; जेव्हा दहशतवादाने संसदेला घेरलं…)