टाटाचा 3,750 उद्योगांसोबत करार‎,‎ 15 हजार विद्यार्थ्यांना मिळणार रोजगार‎

113

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल‎ सायन्सेस सोबत‎ राज्य शासनाने नुकताच सामंजस्य करार‎ केला‎ आहे. यामुळे राज्यातील बारावीच्या १५ हजार विद्यार्थ्यांना‎ शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध ‎होणार‎ आहे. त्याबरोबरच टाटा इन्स्टिट्यूटने ‎राज्यातील सुमारे साडेतीन हजार‎ उद्योगांसोबत ‎सामंजस्य करार केला आहे.

या योजनेंतर्गत ‎विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख‎ शिक्षणाच्या संधी‎ बरोबरच स्थानिकस्तरावरही रोजगाराच्या संधी ‎उपलब्ध असणार आहे.‎‎ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या‎‎ नामांकित मानद विश्वविद्यालय संस्थेच्या‎ ‘स्कूल‎ ऑफ व्होकेशनल एज्युकेशन’ या‎ विभागाद्वारे‎ यूजीसी निकषानुसार पदविका व‎ पदवी प्राप्त‎ करण्याची संधी उपलब्ध करून‎ देण्यात येणार‎ आहे.यासाठी ‘कमवा व शिका’‎ या तत्त्वावर‎ कोणत्याही शाखेचा विद्यार्थी इयत्ता‎ बारावीनंतर‎ प्रवेश घेऊ शकणार आहे.

(हेही वाचा – मध्य रेल्वेचा दोन दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक, कसं असणार गाड्यांचं वेळापत्रक

या संस्थेने‎‎ ‎अभ्यासक्रमाकरिता ३ हजार ७५० उद्योगांसोबत‎‎ करार केला असून, विद्यार्थ्यांना‎ स्थानिकस्तरावर‎ त्यांच्या आवडीनुसार विषय‎ अथवा जॉबरोल‎ निवडण्याची सोय उपलब्ध‎ असणार आहे.‎ त्यामध्ये प्रामुख्याने अॅग्रिकल्चर,‎ ऑटोमोटिव,‎ चाइल्ड केअर, इलेक्टॉनिक्स,‎ लाइफ सायन्स,‎ रिटेल मॅनेजमेंट, मॅनेजमेंट अॅन्ड‎ आंत्रेप्युनरशिप,‎ टुरिझम अॅन्ड हॉस्पिटॅलिटी,‎ माहिती तंत्रज्ञान,‎ ‎ मीडिया व एंटरटेन्मेंट, बँकिंग‎ व वित्तीय क्षेत्र‎ यामधील संधींचा समावेश आहे.‎ अभ्यासक्रम‎ पूर्ण‎ करणाऱ्या विद्यार्थ्यांना नॅशनल स्किल‎‎ क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आधारित‎ प्रमाणपत्र‎ देण्यात येईल. यामध्ये पहिल्या‎ वर्षानंतर डिप्लोमा‎ कोर्स, दुसऱ्या वर्षानंतर‎ ॲडव्हान्स डिप्लोमा‎ कोर्स तर तिसऱ्या‎ वर्षानंतर बॅचलर इन‎ व्होकेशनल‎ एज्युकेशन हे प्रमाणपत्र मिळणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.