ऋजुता लुकतुके
जानेवारी महिन्यात नवी दिल्लीत झालेल्या ऑटोएक्स्पोमध्ये टाटा मोटर्सनी पहिल्यांदा अल्ट्रोझ रेसर (Tata Altroz Racer) कार लोकांसमोर आणली. तिचा स्पोर्टी लूक आणि झाकपाक डिझाईन तेव्हाच जाणकारांना आवडलं होतं. आणि लवकरच ही कार लाँच करू असं कंपनीने म्हटलं होतं.
ती वेळ आता आलीय. आणि टाटा अल्ट्रोझ रेसर कार डिसेंबरमध्ये रस्त्यावर धावण्यासाठी तयार आहे. या गाडीत १.२ लीटर पेट्रोल टर्बो इंजिन आहे. यातून १२० पीएस आणि १७० एलएम इतकी शक्ती निर्माण होऊ शकते. नेक्सॉन मॉडेलच्या जवळ जाणारं असं हे इंजिन आहे. फक्त यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मोड नाही, जो नेक्सॉनला आहे. आल्ट्रोझमध्ये फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन शक्य आहे. ही गाडी अर्थातच पेट्रोलवर चालेल.
रेसर कार असलेल्या या गाडीचा लूक आणि डिझाईन मात्र आकर्षक आहे. टाटा मोटर्सच्या (Tata Altroz Racer) ट्विटर हँडलवर तिचा व्हीडिओ तुम्ही पाहू शकता.
Introducing the performance avatar of the ALTROZ that is sporty and stunning!
A race car-inspired design combined with exhilarating performance to get your pulses racing!
Visit https://t.co/13c4fq0x9Z to know more. pic.twitter.com/emvS9OsA9M
— Tata Motors Cars (@TataMotors_Cars) January 11, 2023
या गाडीचं इंटिरिअर इतर टाटाच्या गाड्यांपेक्षा आधुनिक आहे. आल्ट्रोझ रेसर (Tata Altroz Racer) कारचा डिजिटल डिस्प्ले मोठा आणि कारटेकशी जोडलेला आहे. गाडीची इतर माहितीही डिजिटल स्क्रीनवरच पाहता येते. गाडीला क्रूझ कंट्रोल आहे. आतील लायटिंग चांगलं आहे. आणि छताला सनरूफही आहे.
या गाडीची स्पर्धा ह्यूंदेच्या आय२० एन सीरिजशी असेल. सुरक्षेच्या दृष्टीने पुढे बसलेल्या दोन प्रवाशांसाठी एअरबॅग देण्यात आल्या आहेत. तर मुलांची सीट नीट बसावी यासाठी सोय करण्यात आली आहे. शिवाय एअरब्रेक यंत्रणाही आहे. पार्किंगला मदत करणारी कॅमेरा यंत्रणाही बसवण्यात आली आहे.
या गाडीची किंमत १० लाख रुपयांपासून सुरू होईल.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community