-
ऋजुता लुकतुके
टाटा मोटर्सच्या या नवीन एसयुव्ही कूप गाडीसाठी लोकांना बरीच वाट पाहावी लागली आहे. पण, अखेर भारतीय बाजारपेठांमध्ये गाडीचं दणक्यात आगमन झालं आहे. गाडीचं बुकिंग सुरूही झालं आहे. १२ सप्टेंबरपासून गाडी शोरुममधून तुमच्या घरी येऊ शकेल. टाटा मोटर्सने अलीकडे कॉम्पॅक्ट एसयुव्ही बाजारपेठेत मोठी आघाडी घेतली आहे. देशभरात या क्षेत्रातील आघाडीची गाडी आहे ती टाटा नेक्सॉनच. आता कूप एसयुव्ही पण, आकर्षक आणि आधुनिक चेहरामोहरा असलेली गाडी टाटाने बाजारात आणली आहे. (Tata Curvv)
(हेही वाचा- Aircraft Crashed: हवाई दलाचे Mig -29 लढाऊ विमान कोसळले! स्फोट होऊन भीषण आग)
दोन टर्बो पेट्रोल आणि एक डिझेल अशा तीन इंजिनांचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. गाडीची किंमत त्यानुसार वाढणार आहे. पूर्णपणे स्वयंचलित गाडीचा पर्यायही आहे. पण, या गाड्यांच्या किमती कंपनीने अजून उघड केलेल्या नाहीत. टाटा कर्व्ह गाडी आपल्याला चार प्रकारात उपलब्ध होणार आहे. त्यांची नावं कंपनीने नावीन्यपूर्ण ठेवली आहेत. कर्व्ह स्मार्ट, प्युअर, क्रिएटिव्ह आणि अकम्प्लिश्ड असे हे चार प्रकार आहेत. पैकी शेवटचे दोन प्रकार हे पूर्णपणे स्वयंचलित असून त्यांच्या किमती अजून कंपनीने उघड केलेल्या नाहीत. पण, मूलभूत स्मार्ट मॉडेल हे १० लाख रुपयांना तर प्युअर मॉडेल १०.९९ लाख रुपयांना उपलब्ध असेल. (Tata Curvv)
Prices for the Tata Curvv ICE versions are out and finally give us an idea of what @TataMotors GDi tech will cost. The GDi engine will roll out to other products too. #TataMotors #Curvv pic.twitter.com/Wzf5nKOMNW
— Sergius Barretto 🇮🇳 (@SergiusBarretto) September 2, 2024
टाटाच्या नेक्सॉन आणि हॅरिअर या दोन गाड्यांच्या मधली अशी ही श्रेणी आहे. १.२ लीटर पेट्रोल टर्बो, १.५ लीटर टर्बो आणि १.६ लीटर डिझेल अशा तीन इंजिन प्रकारात गाडी उपलब्ध असेल. नेक्सॉन आणि हॅरिअरमधील सगळ्या सुविधा तुम्ही निवडाल त्या मॉडेलनुसार तुम्हाला मिळतील. गाडीतील दिवे हे एलईडी प्रकारचे आहेत. आणि हॅऱिअरप्रमाणेच आकर्षक ग्रिलही गाडीला देण्यात आलंय. तर आतील केबिन हे नेक्सॉनसारखं आहे. यात १२.३ इंचांचा डिस्प्ले, चालकासमोर ३६० अंशांचा कॅमेरा, ६ सुरक्षा एअरबॅग, आणि अव्वल दर्जाची चालक सुरक्षा यंत्रणा या गाडीत असेल. (Tata Curvv)
(हेही वाचा- ST Employee Strike: ऐन गणेशोत्सव काळात एसटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन, आता काय आहे मागणी?)
टाटा कर्व्हची स्पर्धा भारतीय बाजारपेठेत सिट्रॉ़न बेसाल्ट, होंडा एलिव्हेट, मारुती ग्रँड व्हितारा आणि फोक्सवॅगन टायगन यांच्याशी असेल. (Tata Curvv)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community