एअर इंडिया पुन्हा होणार ‘टाटा’चीच… लवकरच होणार घोषणा

एअर इंडियाच्या खासगीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर आता ही कंपनी पुन्हा एकदा टाटा समूह विकत घेणार असल्याची माहिती मिळत आहे. एअर इंडियासाठी टाटा समूहाकडून सगळ्यात जास्त बोली लावण्यात आली असल्याचे समजत असून, याचा अंतिम निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मूळ कंपनी टाटांचीच

1932 साली टाटा समूहाच्या जे.आर.डी टाटा यांनी टाटा एअरलाईन्सतर्फे एअर इंडिया ही देशातील पहिली विमान सेवा सुरू केली होती. स्वातंत्र्यानंतर देशाला एका राष्ट्रीय विमान कंपनीची गरज भासू लागल्याने सरकारने एअर इंडियामध्ये 49 टक्क्यांची गुंतवणूक केली. त्यानंतर मात्र 1953 साली एअर कॉर्पोरेशन अॅक्टअंतर्गत एअर इंडियामध्ये 100 टक्के भागीदारी मिळवत तिला पूर्णपणे सरकारी कंपनी करण्यात आले.

सतत होत होता तोट

गेल्या काही वर्षांपासून सरकारच्या ताब्यात असलेली एअर इंडिया ही विमान सेवा देणारी कंपनी डबघाईला आली होती. कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने सरकारला ही कंपनी चालवण्यासाठी कर्जाचा बोझा सहन करावा लागत होता. त्यामुळे एअर इंडियाचे 100 टक्के खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.

इतक्या कोटींचे कर्ज

एअर इंडियावर 38 हजार 366 कोटी रुपयांचे कर्ज आहे. एअर इंडियाकडे एकूण 46 हजार कोटी रुपयांची संपत्ती असून यात जमीन, इमारतींचा समावेश आहे. सतत होणा-या तोट्यामुळे 20 वर्षांपासून एअर इंडिया विकण्यासाठी प्रयत्न चालू होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here