आयटी सेवा क्षेत्रात ‘ही’ कंपनी जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी!

107

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही जगभरातील आयटी सेवा क्षेत्रात दुसरी सर्वांत मोठी कंपनी बनली आहे. टीसीएसने वर्षभरात १२ टक्के आणि २०२० नंतर २४ टक्के प्रगती केली आहे. टीसीएसची ब्रॅन्ड व्हॅल्यू १६.८ बिलियनपर्यंत पोहोचली आहे. २०२१ मध्ये टीसीएसच्या कमाईत वाढ झाली. त्यात २५ अरब डॉलरची रेकॉर्ड कमाई झाली. टीसीएसची ही मोठी कमाई आहे. पहिल्यांदाच टीसीएस ब्रॅन्ड व्हॅल्यूच्या तुलनेत जगातील आयटी कंपन्यांमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.

सततच्या गुंतवणुकीमुळे कंपनीने गाठले स्थान

ब्रँड फायनान्सचे सीईओ आणि अध्यक्ष डेव्हिड हेग म्हणाले की, प्रथमच, टीसीएस हा आयटी क्षेत्रातील दुसरा सर्वांत मोठा ब्रँड बनला आहे. ही कंपनी आयटी सेवांच्या क्रमवारीत सातत्याने सुधारणा करत आहे. टीसीएसने गेल्या वर्षी आपली जागतिक ब्रँड व्हॅल्यू मजबूत केली. सततच्या गुंतवणुकीमुळे कंपनीने हे स्थान गाठले आहे.

(हेही वाचा – …आधी राष्ट्रपतींचा राजीनामा मागणार का?, राऊतांचा भाजपला सवाल )

ही कंपनी पहिल्या स्थानी कायम 

‘ब्रँड फायनान्स’ चा रिपोर्ट नुकताच जारी करण्यात आला आहे. टाटा कन्सल्टन्सी व्यतिरिक्त यामध्ये भारतातील अन्य आयटीमधील बड्या कंपन्यांची नावे समाविष्ट आहेत. यामध्ये इन्फोसिस आणि अन्य चार टेक कंपन्यांनी टॉप 25 आयटी सर्व्हिसेस ब्रँडमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. ब्रँड फायनान्सच्या रिपोर्टमध्ये अ‍ॅक्सेंच्युअर आपले पहिले स्थान कायम राखले आहे. तर इन्फोसीसही वेगाने विस्तार पावणारी आयटी कंपनी ठरली आहे. दरवर्षी आयटी सर्व्हिस कंपन्यांचं रिपोर्ट कार्ड ब्रँड फायनान्स जाहीर करते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.