Tecno Camon 30 Pro : १२ जीबी रॅम, ५१२ जीबी स्टोरेज…सगळं २२,००० रुपयांत 

Tecno Camon 30 Pro : गेमिंगसाठी टेक्नो कॅमन ३० प्रो एक चांगला पर्याय आहे 

126
Tecno Camon 30 Pro : १२ जीबी रॅम, ५१२ जीबी स्टोरेज…सगळं २२,००० रुपयांत 
Tecno Camon 30 Pro : १२ जीबी रॅम, ५१२ जीबी स्टोरेज…सगळं २२,००० रुपयांत 
  • ऋजुता लुकतुके

टेक्नो कंपनीने यावर्षी सुरुवातीलाच आपली कॅमन मालिका बार्सिलोना इथं सगळ्यात आधी लोकांसमोर आणली. त्यातील कॅमन ३० प्रिमिअर (Tecno Camon 30 Pro) आणि ५जी फोनला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दिसायला आधुनिक आणि आकर्षक तसंच सगळ्यात कमी रेंजमधील फोनमध्येच १२ जीबीची रॅम असा हा फोन अल्पावधीतच तरुणांमध्ये लोकप्रिय झाला. खासकरून युरोपमध्ये टेक्नो कंपनीने चांगली बाजारपेठ काबीज केली. (Tecno Camon 30 Pro)

(हेही वाचा- International Yoga Day 2024 : भारताची जगाला अनमोल भेट; आंतरराष्ट्रीय योग दिन)

आता वेळ झाली आहे ती टेक्नो कॅमन ३० प्रो (Tecno Camon 30 Pro) च्या स्वागताची. हा फोनही दमदार कामगिरी करताना दिसत आहे. कामगिरीच्या दृष्टीने ताकदवान असा हा स्मार्टफोन आहे. यात मीडियाटेक डिमेन्सिटी ८२०० बसवण्यात आलंय. त्यामुळे गेमिंगसाठी या फोनचा चांगला वापर होऊ शकेल. त्याशिवाय १२ जीबीची रॅम आणि ५१२ जीबीचं स्टोरेज तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे लोकांची या फोनवर नजर जाणार हे नक्की आहे. (Tecno Camon 30 Pro)

 फोनचं बाकी डिझाईन हे ३० सीरिजमधील इतर फोन सारखंच आहे. ६.७ इंचांचा एमोल्ड डिस्पे या फोनमध्ये आहे. तर ५,००० एएमएच क्षमतेची तगडी बॅटरी आहे. आणि ७० वॅटचा फास्ट चार्जरही फोनबरोबर येतो. फोनचं वजन १८९ ग्रॅम इतकं आहे. अँड्रॉईड १४ हा प्रणाली या फोनमध्ये वापरण्यात आली आहे. तर ऑक्टा कोअर प्रोसेसर आहे. कॅमन प्रो फोनमध्ये सगळ्यात हाय एंडचा फोन हा १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजचा आहे. (Tecno Camon 30 Pro)

(हेही वाचा- Pankaja Mande यांचं राजकीय पुनर्वसन होणार? देवेंद्र फडणवीस यांनी नाव सुचवल्याची माहिती)

फोनमधील प्राथमिक कॅमेरा हा ५० मेगापिक्सेलचा आहे. अल्ट्रा वाईड लेन्सही ५० जीबीची आहे. यातील व्हीडिओ हा ४के क्षमतेचा आहे. फोनमध्ये डॉल्बी साऊंड असलेले स्पीकरही बसवण्यात आले आहेत. अशा या फोनची किंमत भारतीय बाजारांमध्ये २२,९९९ रुपयांपासून सुरू होते. (Tecno Camon 30 Pro)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.