अल्पवयीन हिंदू मुलींचे होत आहे ब्रेन वॉश? पोलिसांनी दिले चौकशीचे आदेश

अल्पवयीन हिंदू मुलींचे ब्रेन वॉश करुन त्यांना हिजाब परिधान करण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे.

नागपुरात अल्पवयीन हिंदू मुलींना जबरदस्तीने हिजाब घालण्याची घटना समोर आल्यानंतर त्याचा हिंदू संघटनांकडून जोरदार विरोध करण्यात आला. त्यासोबतच सोशल मीडियावरुन सुद्धा याबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ट्विटरवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ नागपूर शहरातील वॉकर्स स्ट्रीट येथील आहे. ज्यात मुस्लिम बुरखाधारी महिला अल्पवयीन हिंदू मुलींचे ब्रेन वॉश करुन त्यांना हिजाब परिधान करण्यासाठी प्रेरित करत असल्याचे दिसत आहे. या प्रकाराला तेथील स्थानिकांनी विरोध करताच त्यांना हिंदू तरुणींकडूनच प्रश्न विचारण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नागपूर पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

(हेही वाचाः आता ‘हिजाब जिहाद’ची सुरुवात? वाचा काय आहे षडयंत्र)

दुसरा व्हिडिओ नागपूर शहराच्या सदर पोलिस स्थानकातील आहे. ज्यात सुदर्शन चॅनेलच्या पत्रकारांनी हिंदुवादी नेत्यांशी संवाद साधला आहे.

नागपूर पोलिसांचे आवाहन

अशा पद्धतीच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणा-यांना नागपूर पोलिसांनी इशारा दिला आहे. अशा पोस्टमुळे शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, म्हणून पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही नागपूर पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here