‘मोदींना फाशीची शिक्षा मिळावी म्हणून रचला कट’; तिस्ता सेटलवाड यांच्यावर गंभीर आरोप

नरेंद्र मोदींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी तिस्ता सेटलवाड यांनी कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गुजरात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात सेटलवाड यांच्यावर हे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 2002 सालच्या गुजरात दंगलीप्रकरणी बनावट पुरावे तयार केल्याचा आरोप केला जात आहे. सरकारचा भाग नसतानासुद्धा आर.बी श्रीकुमार आणि संजीव भट यांनी तिस्ता सेटलवाड यांच्यासाठी खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप केला जात आहे.

( हेही वाचा: शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना महापालिकेने परवानगी नाकारली )

पंतप्रधान मोदींना अडकवण्यासाठी पुरावे तयार केले

आरोपपत्रानुसार, तिस्ता सेटलवाड यांनी 2002 च्या गुजरात दंगलीत तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यामान पंतप्रधान यांनी अडवकण्यासाठी पुरावे, बनावट कागदपत्रे तयार केली होती. या कटात दोन माजी आयपीएस अधिकारी आरबी श्रीकुमार आणि संजीव भट यांचाही सहभाग होता, असे एसआयटीने म्हटले आहे.

तसेच, तिस्ता सेटलवाड आणि संजीव भट एकमेकांच्या संपर्कात असल्याचा आरोप एसआयटीने केला आहे. संजीव भट हे प्रमुख पत्रकार, स्वयंसेवी संस्था आणि गुजरात विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांच्याशी ईमेलद्वारे संपर्कात होते. सध्या या आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 468, कलम 194 आणि कलम 218 या कलमांसह इतर तरतुदींखाली आरोप निश्चित केले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here