वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर टेम्पो आणि बसचा भीषण अपघात; ट्रक चालकाचा मृत्यू

मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाकोला ब्रिजवर मध्यरात्री मोठी दुर्घटना झाली. टेम्पो आणि बसमध्ये धडक होऊन अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. तर बसच्या चालक घटनास्थळावरुन फरार झाला . महत्त्वाचे म्हणजे या बसमध्ये कॅथे पॅसिफिक एअरलाईन्सचे कर्मचारी होते, जे ताज लॅण्ड्ल एंड हाॅटलेमध्ये जात होते. हे सर्व कर्मचारी परदेशी नागरिक आहेत.

अपघातामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. तर टेम्पोमधून माशांची वाहतूक करण्यात येत होती. अपघातानंतर मासे रस्त्यावर पडले. यामुळे रस्तादेखील निसरडा झाला होता. घटनास्थळावर उपस्थित मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान बसमधील कर्मचा-यांची विचारपूस करत होते. पोलीस सध्या या दुर्घटनेबाबत अधिक तपास करत आहेत.

( हेही वाचा: शाहरुख खानच्या बंगल्यात शिरले दोन संशयित; फॅन असल्याचा दावा )

बस चालकाचा पोलिसांकडून शोध सुरु

मध्यरात्री 1:30 च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालकाचा मृत्यू झाला आहे तर बस चालकाने पोबारा केला आहे. बसमध्ये उपस्थित प्रवासी एअरलाईन्सचे कर्मचारी सर्व परदेशी नागरिक आहेत. यापैकी एका महिला प्रवाशाच्या नाकाला दुखापत झाली आहे. तिला उपचारांसाठी व्ही एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित वाहतूक पोलीस, अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस एकत्र मिळून काम करत आहेत. तर बस चालकाचा शोध सुरु करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here