शिवज्योत घेऊन जाणा-या टेम्पोचा भीषण अपघात; 20 ते 25 शिवभक्त जखमी

113

शिवज्योत घेऊन जाणा-या टेम्पोला मालवाहू भरधाव ट्रकने पाठीमागून जोरात धडक दिल्याने भीषण अपघात होऊन 20 ते 25 शिवभक्त जखमी झाल्याची घटना घडली आहे. मुंबई-बेंगळुरु महामार्गावर पहाटे पावणे चारच्या सुमारास ताथवडे येथे हा अपघात झाला. सुदैवाने या भीषण अपघातात जीवितहानी झालेली नाही. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई- बंगळुरु महामार्गावर शिवज्योत घेऊन जाणा-या टेम्पोला भरधाव ट्रकने भीषण धडक दिल्याने 20 ते 25 शिवभक्त जखमी झाले. ही घटना पहाटे पावणे चारच्या सुमारास घडली आहे. रात्री 10च्या सुमारास मल्हार गड येथून शिवज्योत कार्ला येथील शिळाटना येथे घेऊन निघाले होते. पहाटे पावणे चारच्या सुमारास भरधाव ट्रकने त्यांच्या टेम्पोला पाठीमागून धडक दिली. यात शिवभक्त जखमी झाले असून, त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टेम्पोमध्ये 35 जण होते, त्यापैकी 20 ते 25 जणांना किरकोळ आणि गंभीर दुखापत झाली आहे, अशी माहिती डाॅक्टर आणि शिवभक्तांनी दिली आहे. या घटनेप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी क्लिनरला ताब्यात घेतले आहे.

( हेही वाचा: ….म्हणून दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी हिंदी विषयाचा पेपर दिला नाही )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.