Amarnath Yatra 2022: ‘या’ कारणामुळे अमरनाथ यात्रा तुर्तास स्थगित

132

कोरोना महामारीमुळे तीन वर्षांनंतर 30 जूनपासून सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेला खराब हवामानामुळे ब्रेक लागला आहे. खराब हवामान आणि दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे प्रशासनाने मंगळवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील पवित्र अमरनाथ यात्रा तुर्तास स्थगित करण्यात आली आहे.

सुरक्षेचा उपाय म्हणून वाहतूक बंद

राज्यातील अनेक भागात रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे पहलगाम आणि बालटाल भागात दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच वातावरण निरभ्र होईपर्यंत भाविकांना बेस कॅम्पमध्ये थांबण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

(हेही वाचा – Ed Raid: Vivo सह चीनी कंपन्यांवर मोठी कारवाई, देशभरात 44 ठिकाणी छापे)

आतापर्यंत 40, 233 भाविकांनी घेतले दर्शन

मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात पुढील 24 ते 36 तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रात्री उशिरापासून खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. गेल्या 30 जून रोजी यात्रा सुरू झाल्यापासून आतापर्यंत 40 हजार 233 भाविकांनी येथे भेट दिली आहे. आतापर्यंत 72 हजारांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेतील बर्फापासून बनवलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. अमरनाथ यात्रा 11 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर संपणार आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.