महाराष्ट्रात तयार झालेत ‘दहा’ नवीन जिल्हे, कोणते? वाचा

नुकताच 1 मे 2022 ला 62वा महाराष्ट्र दिन राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोविडनंतर निर्बंधमुक्त असा हा पहिलाच महाराष्ट्र दिन असल्यामुळे राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

1 मे 1960 ला द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची स्थापना झाली. त्यावेळी महाराष्ट्रात एकूण 26 जिल्हे, 235 तालुके आणि 4 प्रशासकीय विभाग होते. पण वाढत्या लोकसंख्येनुसार यामध्ये कालांतराने वाढ झाली. 1 मे 1960 पासून आतापर्यंत राज्यात एकूण दहा नवीन जिल्हे तयार झाले आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. कोणते आहेत ते नवीन जिल्हे?

(हेही वाचाः 1 मे 1960 ला महाराष्ट्रापासून कसं वेगळं झालं गुजरात? वाचा)

1. सिंधुदुर्ग

1 मे 1981 च्या महाराष्ट्र दिनी रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधदुर्ग जिल्हा नव्याने तयार करण्यात आला. सध्या सिंधुदुर्गात एकूण 8 तालुके आहेत.

क्षेत्रफळ- 5 हजार 207 चौ.किमी.

सिंधुदुर्ग जिल्हा

2. जालना

1 मे 1981लाच औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्ह्याची नव्याने निर्मिती करण्यात आली. जालना जिल्ह्यात देखील सध्या 8 तालुके आहेत.

क्षेत्रफळ- 7 हजार 718 चौ.किमी.

जालना जिल्हा

3. लातूर

16 ऑगस्ट 1982 ला औरंगाबाद प्रशासकीय विभागातील उस्मानाबाद जिल्ह्यातून, लातूर जिल्हा नव्याने तयार करण्यात आला. लातूर जिल्ह्यात सध्या 10 तालुके आहेत.

क्षेत्रफळ- 7 हजार 157 चौ.किमी.

लातूर जिल्हा

4. गडचिरोली

26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर(चांदा) जिल्ह्यातून गडचिरोली जिल्हा नव्याने तयार झाला. गडचिरोलीत एकूण 12 तालुके आहेत.

क्षेत्रफळ- 14 हजार 433 चौ.किमी.

गडचिरोली जिल्हा

5. मुंबई उपनगर

प्रशासकीय सोयीसाठी 4 ऑक्टोबर 1990ला मुंबई शहरातून मुंबई उपनगर या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. मुंबई उपनगरात एकही तालुका नाही. अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला याठिकाणी प्रशासकीय कामकाजासाठी कार्यालये उभारण्यात आली आहेत.

क्षेत्रफळ- 446 चौ.किमी.

(हेही वाचाः 1 मे महाराष्ट्राचा, मग इतर राज्यांचे वाढदिवस कोणते? वाचा एका क्लिकवर)

6. नंदुरबार

1 जुलै 1998 ला उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यात एकूण 6 तालुके आहेत.

क्षेत्रफळ- 5 हजार 47 चौ.किमी.

नंदुरबार जिल्हा

7. वाशीम

1 जुलै 1998 या दिवशीच अमरावती प्रशासकीय विभागातील अकोला जिल्ह्यातून वाशीम हा नवीन जिल्हा तयार झाला. वाशीम जिह्यातील एकूण तालुक्यांची संख्या 6 आहे.

क्षेत्रफळ- 5 हजार 153 चौ.किमी.

वाशीम जिल्हा

8. हिंगोली

1 मे 1999 ला परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्हा तयार झाला. सध्या हिंगोलीत 5 तालुके आहेत.

क्षेत्रफळ- 4 हजार 524 चौ.किमी.

हिंगोली जिल्हा

(हेही वाचाः भारतातल्या पहिल्या रेल्वेतून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण? माहीत आहे का?)

9. गोंदिया

याच दिवशी भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्हा नव्याने तयार करण्यात आला. या जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत.

क्षेत्रफळ- 5 हजार 435 चौ.किमी.

गोंदिया जिल्हा

10. पालघर

1 ऑगस्ट 2014 रोजी कोकण प्रशासकीय विभागातील ठाणे या सर्वात मोठ्या जिल्ह्याचे विभादन होऊन पालघर हा नवीन जिल्हा स्थापन झाला. सध्या पालघर जिल्ह्यात एकूण 8 तालुक्यांचा समावेश आहे.

क्षेत्रफळ- 5 हजार 344 चौ.किमी.

पालघर जिल्हा

 

(हेही वाचाः युद्धातही देशाच्या मदतीला धावून आली होती ‘एसटी’)

सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे, 355 तालुके आणि 6 प्रशासकीय विभाग आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here