माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे नेपाळी गिर्यारोहक Tenzing Norge

Tenzing Norge : तेंझिंग नोर्गे हे एक नेपाळी गिर्यारोहक होते. २९ मे १९५३ साली त्यांनी एडमंड हिलरी यांच्यासोबत माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केलं होतं.

154
माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे नेपाळी गिर्यारोहक Tenzing Norge
माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे नेपाळी गिर्यारोहक Tenzing Norge

तेंझिंग नोर्गे (Tenzing Norge) हे एक नेपाळी गिर्यारोहक होते. २९ मे १९५३ साली त्यांनी एडमंड हिलरी यांच्यासोबत माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केलं होतं. विसाव्या शतकातल्या सर्वात प्रभावशाली शंभर लोकांच्या यादीमध्ये तेंझिंग नोर्गे (Tenzing Norge) यांचंही नाव समाविष्ट आहे.

तेंझिंग (Tenzing Norge) यांच्या सुरवातीच्या आयुष्याविषयी विसंगत असलेल्या कथा ऐकायला मिळतात. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी असं लिहिलं आहे की ते एक शेर्पा आहेत. त्यांचा जन्म ईशान्य नेपाळमध्ये टेंगबोचे, खुम्बु येथे झाला होता. तर १९८५ साली ऑल इंडिया रेडिओला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असं सांगितलं की, त्यांचे पालक तिबेटमधून आले होते. पण त्यांचा जन्म नेपाळमध्ये झाला. (Tenzing Norge)

(हेही वाचा- Dombivli MIDC स्फोट प्रकरणाचा येत्या ३ आठवड्यांत तपास, उद्योगमंत्र्यांनी बैठकीत दिली ‘ही’ माहिती)

त्यानंतर त्यांच्या जामलिंग तेंझिंग (Tenzing Norge) नावाच्या मुलाने एका पुस्तकाचं सहलेखन केलं होतं. त्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आढळतं की, तेंझिंग नोर्गे (Tenzing Norge) यांचा जन्म तिबेटच्या कामा या खोऱ्यातल्या त्से चु नावाच्या गावात झाला. थामे या ठिकाणी ते वाढले. त्यांनी आपलं बालपण देशाच्या उत्तरेकडच्या भागात खरता नावाच्या गावात घालवलं. खुम्बु इथल्या एका शेर्पा कुटुंबासाठी काम करण्याकरिता तेंझिंग नोर्गे नेपाळला गेले होते. त्यांना लोक शेर्पा म्हणूनही ओळखायचे. (Tenzing Norge)

खुम्बु हे माऊंट एव्हरेस्ट जवळच आहे. तिबेटीयन आणि शेर्पा लोक त्याला चोमोलुंगमा असं म्हणतात. तिबेटी भाषेत या नावाचा अर्थ ‘पवित्र माता’ किंवा ‘शिखरांची देवी’ असा होतो. बौद्ध धर्म हा शेर्पा आणि तिबेटीयन लोकांचा पारंपरिक धर्म आहे. तेंझिंग नोर्गे हे बौद्ध होते. (Tenzing Norge)

(हेही वाचा- निबंध भोवणार! Pune Porsche Car Accident प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या सदस्यांची चौकशी होणार)

तेंझिंग नोर्गे (Tenzing Norge) यांचा नेमकी जन्म दिनांक माहीती नसला तरी हवामान आणि पिकांच्या अंदाजावरून मे महिन्याच्या उत्तरार्धात त्यांचा जन्म झाला असं कळलं होतं. २९ मे १९५३ साली त्यांनी माऊंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केल्यानंतर त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला. तिबेटीयन दिनदर्शिकेनुसार त्याच्या जन्माचं वर्ष हे सशाचं वर्ष होतं. त्यामुळे त्यांचा जन्म १९१४ साली झाला असावा, असा अंदाज लावला जातो. १९५३ साली ते ३९ वर्षांचे होते. तेंझिंग नोर्गे (Tenzing Norge) यांनी स्वतःला त्यांच्या काळातले आणि सबंध जगातले एक अग्रगण्य गिर्यारोहक म्हणून सिद्ध केलं होतं.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.