मुंबई- गोवा महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू तर 23 जखमी

मुंबई- गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच आहे. सिंधुदुर्गातील कणकवलीत एका खासगी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. वागदे पुलानजीक खासगी बस चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात 4 ठार तर 23 जण जखमी झाले आहेत.

ही खासगी बस मुंबईहून गोव्याकडे जात होती. पहाटे 4 वाजता हा अपघात झाला असून, गडनदी पुलावरील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि हा अपघात झाला. या बसमध्ये 36 प्रवाशी होते. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

( हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, वाहतुकीत मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर )

10 जणांची प्रकृती गंभीर 

पुण्याहून गोव्याकडे जाणारी खासगी बस गुरुवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास हळवल फाटा येथे आली असता चालकाचा ताबा सुटून खासगी बस पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अनिल जाधव आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here