NIA आणि ED धाडी टाकत असलेले PFI आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर

94

संपूर्ण देशभरात एनआयए आणि ईडीने पीएफआयच्या संबंधित कार्यालयांवर धाडी टाकल्या आहेत. एनआयए आणि ईडीने देशभरातून 100 हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. आता ज्या PFI वर ही कारवाई सुरु आहे, ते PFI म्हणजे आहे तरी काय? तसेच त्यांचे काम आहे तरी काय? ते जाणून घेऊया.

PFI म्हणजे काय?

पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही एक इस्लामिक संघटना आहे. ही संघटना आपल्या समुदायातील मागासवर्गीयांचे हक्क मिळवून देण्यासाठी काम करते. 2006 मध्ये नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंटची उत्तराधिकारी संघटना म्हणून स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेची मुळ केरळच्या कालिकतशी जोडली गेली आहेत. सध्याच्या घडीला या संघटनेचे मुख्यालय दिल्लीतील शाहीन बाग येथे असल्याचे कळते आहे. शाहीन बाग हा तोच भाग आहे, जिथे CAA आणि NRC विरोधात देशभरातून 100 दिवसांचे प्रदीर्घ आंदोलन पुकारण्यात आले होते.

इस्लामिक संघटना असल्यामुळे PFI चे बहुतांश काम या समाजाभोवती फिरताना दिसते. अनेकदा या संघटनेशी संलग्न व्यक्ती मुस्लिम आरक्षणासाठी रस्त्यांवर उतरुन आंदोलने करतात.

( हेही वाचा: शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना महापालिकेने परवानगी नाकारली )

PFI चे काम देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने धोक्याचे?

2012 मध्ये केरळ सरकारने एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान न्यायालयात अतिशय लक्षवेधी विधान मांडले होते. PFI ची कामे देशाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने धोक्याची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.