राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जम्मू काश्मिरमध्ये अनेक ठिकाणांवर छापे टाकल्याचे समोर आले आहे. टेरर फंडिंग प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज, मंगळवारी जम्मू-काश्मिरात अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे.
(हेही वाचा – शिंदे गटाकडून चिन्हासाठी ‘हे’ ३ पर्याय सादर, निवडणूक आयोगाला केला E-Mail)
मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये पुंछ, जम्मू, राजौरी, पुलवामा, श्रीनगर, बडगाम, बांदिपोरा, शोपियांन इत्यादी शहरांचा समावेश आहे. जम्मू काश्मिरातील बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केलेल्या जमात-ए-इस्लामी या संघनटेसाठी काम करत असलेल्या अल-हुदा-एज्युकेशनल ट्रस्टच्या फंडिंग पॅटर्नमुळे राष्ट्रीय तपास संस्थेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने पीएफआय या संस्थेच्या देशभरातील कार्यालयावर छापे टाकले होते. त्यामध्ये १०० पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने या संस्थेवर पाच वर्षाची बंदी घातली होती. यासह त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरही बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर अनेक मुस्लीम कार्यकर्त्यांनी देशभरात सरकारविरोधात निदर्शने देखील केली होती.
Join Our WhatsApp Community