PFI ला फंडिंग करणारी 500 हून अधिक बँक खाती रडारवर

93

दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(पीएफआय) या संघटनेवर बुधवारी केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआयवरील आपली कारवाई कायम ठेवली आहे. पीएफआयला विदेशातून टेरर फंडिंग होत असल्याची माहिती समोर येत असल्याने विदेशी खात्यांचाही तपास करण्यास आता सुरुवात झाली आहे.

500 हून अधिक खाती रडारवर

पीएफआयला जवळपास अर्धा डझन आखाती देशांतून आर्थिक मदत मिळत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे या आखाती देशांतील लोकांची 500 हून अधिक बँक खाती तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आली आहेत. कामासाठी भारतातून आखाती देशांत गेलेल्या लोकांकडून हे फंडिंग केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः ‘पीएफआय’ वर बंदी हा अंतर्गत दहशतवादावर ‘सर्जिकल स्ट्राइक’)

दरमहा 5 ते 6 कोटींची मदत

केंद्रीय तपास यंत्रणांनी देशातील 15 राज्यांमध्ये पीएफआयशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली आहे. यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणावर पुरावे हाती लागले आहेत. यावेळी एनआयने अनेक पीएफआय कार्यकर्त्यांना देखील अटक केली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. आखाती देशातून दरमहा 5 ते 6 कोटी रुपये पीएफआयला मिळत असल्याचे समोर आले आहे.

कोडवर्डद्वारे फंडिंग

तपास यंत्रणांना छापेमारीत अनेक कागदपत्रे आणि डाय-या मिळाल्या असून त्यामध्ये काही कोडवर्ड असल्याचे आढळून आले. तसेच या कुठल्या भागातून किती रक्कम आली याची देखील नोंद या डाय-यांमध्ये होती. या कोडवर्ड्सची उकल आता तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे. पीएफआयच्या कर्नाटक,आंध्र प्रदेश,केरळ आणि तेलंगणा या राज्यातील शाखांना सर्वाधिक आर्थिक रसद पुरवण्यात आल्याचेही तपास यंत्रणांच्या लक्षात आले आहे.

(हेही वाचाः ‘अक्कल नसलेल्या मूर्खांना मी उत्तर देत नाही’, फडणवीसांचे काँग्रेसला प्रत्युत्तर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.