अरे वा… काश्मिरात उरले केवळ 39 दहशतवादी!

जम्मू-काश्मीरमध्ये काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी गुरुवारी दहशतवाद्यांच्या संख्येबाबत मोठे विधान केले आहे. यावेळी ते म्हणाले, काश्मीरमध्ये आता दहशतवाद्यांची संख्या कमी होत असून पहिल्यांदाच संपूर्ण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची संख्या 200 पेक्षा कमी झाली आहे. धक्कादायक म्हणजे यावर्षी आतापर्यंत 128 स्थानिक तरूणांचा दहशतवादात सहभाग झाला आहे.

39 दहशतवादी काश्मीरात शिल्लक

काश्मीरमध्ये स्थानिक दहशतवाद्यांची संख्याही प्रथमच 100 पेक्षा कमी झाली आहे. कालच्या (बुधवार) चकमकीनंतर स्थानिक दहशतवाद्यांची संख्या 85-86 वर आली आहे. दहशतवाद वाढत नसून कमी होत आहे. या वर्षी आतापर्यंत 128 स्थानिक तरुण दहशतवादात सामील झाले आहेत, त्यापैकी 73 दहशतवादी चकमकीत ठार झाले असून 16 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तर जवळपास 39 दहशतवादी काश्मीरात शिल्लक आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांना कंठस्नान

बुधवारी जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दोन वेगवेगळ्या चकमकीत जैश ए मोहम्मद संघटनेच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यापैकी 4 दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यातील दोघे पाकिस्तानी आहेत. तर इतर दोन दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

(हेही वाचा – )

सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

यासंदर्भात जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी कुलगाममध्ये सुऱक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यावेळी कुलगाम जिल्ह्यातील मिरहमा भागात ही चकमक झाली. यात 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मिरहमा भागात झालेल्या चकमकीत 2 स्थानिक दहशतवादी तर एकजण जैश ए मोहम्मदशी संबंधित पाकिस्तानी दहशतवादी होता. या परिसरात सुरक्षा दलाची शोध मोहिम सुरू आहे. काश्मीरच्या खोऱ्यात सातत्यानं दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांना टार्गेट केलं जात आहे. यामुळे सुरक्षादलांनी दहशतवाद्यांविरोधात जोरात मोहिम उघडली आहे. अनंतनागमध्येही बुधवारी सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here