जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. जम्मू-काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमधील ईदगाह परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. एका शाळेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. ईदगाह येथील शाळेत झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दोन शिक्षकांची हत्या
मुख्याध्यापक आणि एका महिला शिक्षिकेची यामध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी अचानक बंदुकधा-यांनी आलोचीबाग येथील रहिवासी असलेल्या सतींदर कौर आणि दीपक कौोर या दोघांवर सफा कडल येथे गोळीबार केला. त्यामध्ये हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटनेनंतर या दोघांनाही SKIMS रुग्णालयात हलवण्यात आलं. तेथे त्यांना रुग्णालयाकडून मृत घोषित करण्यात आले.
हिंदूंवर सातत्याने हल्ले
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत मृतांच्या प्रति शोक व्यक्त केला आहे. यापूर्वीही जम्मू -काश्मीरमध्ये काही दिवसांपासून हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत. 5 ऑक्टोबरलाही दहशतवाद्यांनी एकापाठोपाठ तीन हल्ले केले. या हल्ल्यात वैद्यकीय दुकानाचे मालक माखनलाल बिंद्रू यांच्यासह तीन जण ठार झाले. सलग दुसऱ्या दिवशी दोन शिक्षकांच्या हत्येच्या घटनेमुळे दहशतवाद्यांचा उत्साह वाढल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी अचानक भ्याड हल्ला करून दोन्ही शिक्षकांना गोळ्या घालून ठार केले.
Join Our WhatsApp Community