Terrorist Attack: पुंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला, हवाई दलाचा जवान हुतात्मा, ४ जखमी

काही दिवसांपूर्वीच कृष्णा घाटी येथे दहशतवाद्यांनी लष्करी वाहनांच्या ताफ्यावर गोळीबार केला होता, मात्र त्यात जीवितहानी वा कोणी जखमी झाले नव्हते.

166
Terrorist Attack: पुंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला, हवाई दलाचा जवान हुतात्मा, ४ जखमी

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यामध्ये शनिवारी, (३ मे) संरक्षण दलाच्या २ वाहनांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा, तर ४ जवान जखमी झाले. ताफ्यातील एक वाहन हवाई दलाचे होते. लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या फेरीत २५ मे रोजी अनंतनाग-राजौरी मतदारसंघात मतदान होणार आहे. पूंछ हा त्याच मतदारसंघाचा भाग आहे.

संरक्षण दलाची २ वाहने सुरणकोट भागातील सनई टॉपकडे जात असताना त्यांच्यावर शशीधर या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याचे वृत्त कळताच राष्ट्रीय रायफल युनिटच्या जवानांनी शशीधर भागाला वेढा दिला व दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. या घटनेत जखमी झालेल्या जवानांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत. पूंछ शहरामध्ये व परिसरात दहशतवाद्यांचा वावर असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच निमलष्करी जवानांनी शुक्रवारपासून त्या शहरात काही ठिकाणी धाडी घातल्या होत्या, मात्र त्यावेळी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.

(हेही वाचा –Brazil Flood: ब्राझीलमध्ये महापूराचे थैमान! आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू )

लष्करी वाहनांच्या ताफ्यावर केला होता गोळीबार
गेल्या वर्षी २१ डिसेंबरला बुफ्लियाझ येथे लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४ जवान हुतात्मा व ३ जवान जखमी झाले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच कृष्णा घाटी येथे दहशतवाद्यांनी लष्करी वाहनांच्या ताफ्यावर गोळीबार केला होता, मात्र त्यात जीवितहानी वा कोणी जखमी झाले नव्हते.

गेल्या वर्षीचे दहशतवादी हल्ले
– पूंछच्या सीमेवर ढेरा की गली व बुफ्लियाझ या भागादरम्यान गेल्या वर्षी २० एप्रिल रोजी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ५ जवान हुतात्मा झाले होते.
– गेल्या वर्षी मे महिन्यात चामेर जंगलात दहशतवादविरोधी मोहिमेत मेजर पदावरील अधिकारी व ५ जवान हुतात्मा झाले.
– २०२२मध्ये राजौरी जिल्ह्यातील दरहाल भागात परघाल येथे लष्करी छावणीवरील हल्ल्यात ५ जवान हुतात्मा झाले होते.
– ११ ऑक्टोबर २०२१ रोजी दोन स्वतंत्र हल्ल्यांत ९ जवान हुतात्मा झाले. १४ ऑक्टोबर रोजी एका हल्ल्यात ३ जवान हुतात्मा झाले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.