सीआरपीएफच्या मुंबई मुख्यालयात अतिरेक्यांचा धमकीचा ईमेल! काय आहे मजकूर?

100

सीआरपीएफच्या मुंबई मुख्यालयात अतिरेकयांकडून एक धमकीचा मेल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मेलमध्ये सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे आणि विमानतळांवर अनेक बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा मेल 4-5 दिवसांपूर्वी करण्यात आला आहे. सीआरपीएफच्या थ्रेट व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून हे मेल तपास यंत्रणा एनआयएसह इतर गुप्तचर यंत्रणांना देण्यात आले. याबाबत आता एजन्सीकडून तपास करण्यात येत आहे.

काय आहे मेलमधला मजकूर?

या धमकीच्या मेलमध्ये लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा उल्लेख असल्याचे समजत आहे. तीन राज्यांत 200 किलो हाय ग्रेड आरडीएक्स असल्याचा उल्लेख या मेलमध्ये करण्यात आला आहे. 11 पेक्षा जास्त दहशतवादी आणि आत्मघातकी हल्लेखोर सक्रिय असल्याचेही मेलमध्ये नमूद केले आहे. गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोक्यात असल्याचेही मेलमध्ये म्हटले आहे.

मेलच्या शेवटी, मेल पाठवणारा असे लिहितो की,

‘आम्ही अज्ञात आहोत,
आम्ही एक आर्मी आहोत,
आम्ही माफ करत नाही,
आम्ही विसरत नाही,
आमचा इन्तेजार करा

याआधी एनआयए कंट्रोल रुमला धमकीचा फोन

हा मेल मिळाल्यानंतर तपास एजन्सी या मेलचा सोर्स व मेलिंग मागील षडयंत्र शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एनआयए कंट्रोल रूमवरही असाच धमकीचा फोन आला होता. कॉल करणा-याने पाकिस्तानच्या कराची शहरातून कॉल करण्याचा दावा केला होता आणि मुंबई बंदर आणि पोलिस आस्थापनावर जैशच्या हल्ल्याच्या नियोजनाची माहिती दिली होती. या प्रकरणाची चौकशीही सध्या सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.