Tesla CyberTruck : अंतराळ यानासारखा दिसणारा टेस्लाचा सायबर ट्रक नक्की आहे कसा?

अमेरिकेत गाड्यांची इतकी विविधता असूनही रस्त्यावर हा सायबरट्रक दिसला तर इतरांच्या नजरा त्याच्याकडे वळतात आणि खिळतातही असं म्हटलं जातं

239
Tesla CyberTruck : अंतराळ यानासारखा दिसणारा टेस्लाचा सायबर ट्रक नक्की आहे कसा?
Tesla CyberTruck : अंतराळ यानासारखा दिसणारा टेस्लाचा सायबर ट्रक नक्की आहे कसा?

ऋजुता लुकतुके

टेस्ला कंपनीने पहिल्यांदा पूर्णपणे इलेक्ट्रिक असलेली टेस्ला कार (Tesla CyberTruck) अमेरिकेत लाँच केली तेव्हा ही कार वाहन उद्योगातील चमत्कार मानली गेली होती. तिचा लूक मॉडर्न होता. तंत्रज्ञान अत्युच्च दर्जाचं आणि आधुनिक. प्रत्येक कारमध्ये पहिल्यांदा मोठा डिस्प्ले, कळ दाबल्यावर उघडणारी दारं, पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि उच्च श्रेणीतील कारमध्ये चालकाशिवाय गाडी चालवण्याचं कौशल्य! अशा सुविधांनी भरलेली टेस्ला रस्त्यावरून गेली की अमेरिकेतही लोकांच्या नजरा वळायच्या.

आता टेस्लाच्या सायबर ट्रकच्या बाबतीत तेच होतंय. २०२४ मध्ये सायबर ट्रक बाजारात येईल. आणि त्याची उत्सुकतेनं वाट पाहिली जातेय. कंपनीचे मालक एलॉन मस्क स्वत: सायबरट्रकच्या प्रमोशनमध्ये गुंतले आहेत.

(हेही वाचा-Mumbai : ती चौदाव्या मजल्यावरून पडली आणि …कुटुंबियांच्या काळजात झाले धस्स)

अशा या टेस्ला सायबरट्रकमध्ये आहे काय? 

अमेरिकेत लोकप्रिय असलेला पिकअप ट्रक या श्रेणीतील हे वाहन आहे. तिचं पूर्ण शरीर हे स्टीलचं बनलेलं आहे. त्यामुळे बघणाऱ्याला एखादं अंतराळ यान बघितल्यासारखं वाटेल. पण, हे यान प्रशस्त आहे. टेस्लाचा दावा आहे की, या ट्रकमध्ये ३०,००० पाऊंड्स इतक्या वजनाचं सामान वाहून नेण्याची क्षमता आहे. आणि एका चार्जमध्ये ट्रक ३५० माईल्स (अंदाजे ५६० किमी) इतका टप्पा गाठू शकतो.

अशा या सायबर ट्रकची (Tesla CyberTruck) किंमत किती असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असणारए. तर त्याचं उत्तर आहे ६६,५०,००० लाखांपासून पुढे.

इतकंच नाही तर टेस्लाला रस्त्याबरोबरच पाण्यात चालू शकेल असं हायब्रीड मॉडेलही बाजारात आणायचं आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.