जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहते भाड्याच्या घरात

एलाॅन मस्क यांनी ट्विटर खरेदी करत आपले स्वप्न पूर्ण केले. त्यामुळे सध्या एलाॅन मस्क यांची जोरदार चर्चा सुरु आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ख्याती असणारे एलाॅन मस्क हे भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्याविषयी अशा अनेक गोष्टी याआधीही प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्याबाबतीत प्रसिद्ध असणारे काही किस्से आज जाणून घेऊयात.

 • 28 जून 1971

दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरियामध्ये जन्मलेल्या मस्क यांनी वयाच्या 12 व्या वर्षीच व्हिडीओ गेम तयार केला होता.

 • 1999
  मस्क यांनी 1 कोटी डाॅलरची गुंतवणूक करत एक्स डाॅट काॅम ही कंपनी सुरु केली. नंतर ती पेपाल नावाने नावारुपाला आली.
 • 2002

ई- बेने 150 कोटी डाॅलर मोजून पेपाल खरेदी केली. त्यात मस्क यांचा वाटा साडेसोळा कोटी डाॅलरचा होता.

 • 2004

मस्क यांनी 2004 मध्ये टेस्ला या इलेक्ट्रिक कार निर्मात्या कंपनीची उभारणी केली. सद्य स्थितीत टेस्ला ही जगातील क्रमांक एकची कंपनी आहे.

ब्लास्टर गेम

 • ब्लास्टर हा स्पेस फायटिंगचा गेम, त्यांनी एका मासिकाला 500 डाॅलरला विकून टाकला.
 • मस्क यांनी बंधू किंबल याच्या साथीने झिप 2 नावाची साॅफ्टवेअर कंपनी सुरु केली. नंतर ती दोन कोटी डाॅलरला काॅम्पॅक कंपनीला विकून टाकली.

ऐकावे ते नवलच

 • 2018 मध्ये मस्क यांनी टनेल बोअरिंग मशीन तयार केले.
 • त्यासाठी द बोअरिंग ही कंपनीही नोंदणीकृत केली.
 • या कंपनीने एक आग ओकणारे मशीन तयार केले. मस्क यांनी 20हजार यंत्रांची विक्रीही केली.
 • मस्क यांना मंगळ ग्रहावर मानवी वस्ती वसवायची आहे. त्यासाठी त्यांनी तयारी सुरु केली.

( हेही वाचा: म्हाडाच्या 2800 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत, या तारखेपासून करु शकता अर्ज )

एलाॅन मस्क यांना आवडते भाड्याचे घर 

 • जगातील क्रमांक एकची श्रीमंत व्यक्ती असूनही मस्क राहतात भाड्याच्या घरात. त्यांनी त्यांच्या मालकीचे सात आलिशान प्रासाद विकून टाकले.
 • सध्या ते एका परवडणा-या आणि घडी करता येण्याजोग्या घरात राहतात.
 • 8.1 कोटी ट्विटरवर एलाॅन मस्क यांचे फाॅलोअर. सर्वाधिक फाॅलोअर्सच्या संख्येत पहिल्या दहांमध्ये मस्क यांचा क्रमांक लागतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here