शिक्षक पात्रता परीक्षेत शिक्षण विभागातील अधिकारी, परीक्षा आयोजित करणारी कंपनी व एजंट यांनी तब्बल 1,701 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. आरोपींनी सदर 1,701 अपात्रांपैकी मूळ निकालात 817 जणांचे मार्क्स वाढवून त्यांना पात्र ठरवले आहे.
1701 अपात्र परीक्षार्थींना पात्र केलेले
एकूण 884 जणांना अंतिम निकालानंतर पात्र करुन त्यांची नावे राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करुन त्यांना बनावट प्रमाणपत्र दिल्याची गोष्ट चौकशीदरम्यान समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा डोलारे यांच्या न्यायालयात दाखल केले आहे. राज्यात 2018 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत शिक्षण विभागातील अधिकारी, परीक्षा आयोजित करणारी कंपनी व एजंट यांनी तब्बल 1701 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. आरोपींनी 1701 अपात्रांपैकी मूळ निकालात 817 जणांचे मार्क्स वाढवून त्यांना पात्र ठरवले आहे. तर एकूण 884 जणांना अंतिम निकालानंतर पात्र करून त्यांची नावे राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करून त्यांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचे चौकशीदरम्यान समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोन हजार 625 पानांचे दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयात दाखल केले आहे.
(हेही वाचा सिंधुदुर्गातील ‘ही’ पाच गावे शिमग्यापासून राहणार वंचित!)
Join Our WhatsApp Community