टीईटी घोटाळ्यात शिक्षण अधिका-याच्याच मुलीचे नाव आल्याने खळबळ

158

राज्यात गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात ( Maharashtra TET Scam) आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. दरम्यान यात आणखी एक शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. औरंगाबादच्या एका शिक्षण अधिका-याच्याच मुलीचे नाव या घोटाळ्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे समोर आली होती.

या घोटाळ्यात आता खुद्द औरंगाबादचे शिक्षण अधिकारी मधुकर देशमुख यांच्याच मुलीचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या पाच हजार सातशे उमेदवारांच्या गुणांमध्ये फेरफार करुन अपात्र असताना देखील अंतिम निकालामध्ये पात्र जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये देशमुख यांच्या मुलीचे नाव आहे.

( हेही वाचा: परशुराम घाट सर्व वाहनांसाठी खुला; दोन महिन्यांनी हटवले निर्बंध )

महत्त्वाचे मुद्दे

  • ज्यांच्या मुलीचे टीईटी परीक्षेतील बोगस उमेदवाराच्या यादीत नावं आलं आहे ते मधुकर देशमुख हे औरंगाबाद माध्यमिकचे शिक्षण अधिकारी आहेत.
  • विशेष म्हणजे टीईटी पात्र उमेदवारांची पात्रता पडताळणी करण्याचा अधिकार देशमुख यांना आहे.
  • मात्र आता त्यांची मुलगी नुपूर देशमुखचे टीईटी घोटाळ्याच्या यादीत नावं आलं आहे.
  • यापुढे घेण्यात येणा-या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नुपूर देशमुखवर कायमस्वरुपी प्रतिबंध करण्याचा आदेश प्रशासनाने काढला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.