ठाण्यात मेट्रोच्या कामातील सेंट्रिंग प्लेट अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू

ठाण्यात मेट्रो 4 च्या गर्डरची लोखंडी प्लेट कोसळल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील विवियाना माॅलजवळ ही घटना घडली आहे. स्थानिकांनी माहिती देताच, राबोडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महिलेला काढण्यात आले असून, पोलीस या प्रकाराचा अधिक तपास करत आहेत.

( हेही वाचा: सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी पोलिसांनी उचलले ‘हे’ पाऊल )

नेमकं प्रकरण काय?

सुनिका बाबसाहेब कांबळे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. महिलेचे वय 37 वर्षे असून महिला ठाण्यातील लोकमान्य नगर येथील डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर चाळ येथे राहण्यास आहे. गुरुवारी सकाळी 9:30 ते 10 च्या दरम्यान हा अपघात घडला. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई नाशिक रोडजवळ असलेल्या विवियाना माॅलजवळ मेट्रोच्या कामाकरता खड्डा खोदण्यात आला. खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पिलरच्या सपोर्टसाठी लावण्यात आलेली लोखंडी प्लेट महिलेच्या अंगावर कोसळली. लोखंडी प्लेट अंगावर कोसळल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, पिकअप वाहनासह, राबोडी पोलीस कर्मचारी आणि वर्तक नगर पोलीस कर्मचारी एका रग्णवाहिकेसह उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here