ठाणे शहर पोलिसांची वेबसाईट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘वन हॅक सायबर टीम’ कडून वेबसाइट हॅक केल्याचा दावा करण्यात आला आहे. इस्लाममध्ये अडचणी निर्माण केल्याने वेबसाईट हॅक केल्याचा संदेशही देण्यात आला आहे. सोबत एक गाणही अपलोड करण्यात आले आहे.
सकाळपासूनच ठाणे शहर पोलिसांची वेबसाईट हॅक झाली आहे. एका इस्लामिक संघटनेने ही वेबसाईट हॅक केल्याचे त्या वेबसाईटवर म्हटले आहे. वन हॅक सायबर टीम आपल्यासाठी काम करत असल्याचेही यात म्हटले आहे.
( हेही वाचा: पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे ‘हा’ वाहतूक मार्ग बंद; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर )
जगभरातील मुस्लिमांची माफी मागा
मागच्या काही दिवसांपासून नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर, मुस्लिम समाज, संघटना नाराज आहेत. कदाचित याच पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांची वेबसाईट हॅक केल्याचे सांगण्यात येत आहे. भारतात मुस्लिम धर्मीयांच्या बाबतीत अडचणी निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे ही वेबसाईट हॅक करत आम्ही एक संदेश देत आहोत की, जर तुम्ही संपूर्ण जगभरातील मुस्मिमांची माफी मागितली नाही, तर मात्र आम्ही शांत राहणार नाही, असा एक धमकीवजा इशाराच या हॅंकींगच्या माध्यमातून देण्यात आला आहे. यामध्ये एक गाणंही अपलोड करण्यात आले आहे. या गाण्यातही माफी मागण्याचा संदेश देण्यात आला आहे.